शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

दहा हजार मैलांच्या पुलाची ‘कुंपणापलीकडली’ गोष्ट

By admin | Updated: July 1, 2017 18:07 IST

आता अमेरिकेतली मराठी मंडळं गाठून ‘प्रोग्राम’ करायला जाणाऱ्या मुंबै-पुण्याच्या अर्धकच्च्या लेखक-कलावंतांचे कान कोण पकडणार?

- अपर्णा वेलणकरआता अमेरिकेतली मराठी मंडळं गाठून ‘प्रोग्राम’ करायला जाणाऱ्या मुंबै-पुण्याच्या अर्धकच्च्या लेखक-कलावंतांचे कान कोण पकडणार? जे चाललंय ते अजिबात चांगलं नाही अशा स्पष्ट भाषेत कोण सुनावणार? जे नाणं अस्सल-उत्तम वाजणारं असेल, त्याला मऊमऊ दाढीभर-शुभ्र हसून खळखळून प्रेमाने कोण दाद देणार? सातासमुद्रापल्याडहून आलेल्या स्नेहीसोबत्यांना गाडीत घालून स्वत:च्या दुखत्या पाया-पाठीची पर्वा न करता अमेरिकाभर कोण हिंडवणार? त्यांच्यासाठी गरमागरम चविष्ट पदार्थ आणि तिखट झणझणीत चटण्या-चुटण्या कोण रांधणार? पुस्तकं-चित्रं-गाण्यांच्या सळसळत्या गर्दीत मैफल जमवून पहाट फुटेपर्यंत गप्पांची सत्रं कशी बहरणार?

 

- कारण गेली पन्नासाहून अधिक वर्षं अमेरिकेत रंगलेल्या एका अस्सल मराठी मैफिलीचा सदाबहार सूत्रधार आधीच पुढे गेलेल्या बाबुजींच्या, श्रीपुंच्या, पुलं-सुनीताबाईंच्या वाटेने घाईघाई रवाना झाला आहे. ही त्यांची घाईघाई आणि गात-खात-नाचत-गप्पा करत सतत इकडे-तिकडे जात असणं हे तसं नेहमीचंच! त्यामुळे मूळ वॉशिंग्टनचे पण अलीकडेच प्लॉरिडावासी झालेले दिलीप चित्रे गेले म्हणजे ‘नक्की कुठे गेले?’ असा स्वाभाविक प्रश्न पडलेल्या त्यांच्या जगभरच्या स्नेह्यांना शुक्रवार रात्री-शनवारच्या पहाटे या प्रश्नाचं भलतंच उत्तर मिळालं. अभद्र उत्तर. ते पुन्हा न परतण्यासाठी ‘गेल्याची’ वार्ता सांगणारं उत्तर.खरंतर एरवी कुणाला न बधणाऱ्या खट माणसांना रडकुंडीला आणण्यात चित्रे यांचा जन्मभराचा हातखंडा, पण त्यांच्या मृत्यूची वार्ता सगळ्यांनाच हुंदका फुटेल असा चटका देऊन गेली.

 

दिलीप वि. चित्रे. मूळ बडोद्याचे. शिक्षणाने आर्किटेक्ट. पुढे शिकायला आणि नोकरी धरायला म्हणून इंग्लंडला गेले आणि तिथून पुढे अमेरिकेत पोचले. हे सगळं सत्तरीच्या दशकातल्या रीतीप्रमाणेच झालं. अमेरिकेत नोकरी शोधली.संसार मांडला.जागतिक मंदीच्या काळात जात्या नोकरीचं सूत हातून सुटायची वेळ आली तेव्हा रात्रीच्या वेळी वॉचमन म्हणूनही काम केलं.- हळूहळू बस्तान बसलं.

 

इथवरची कहाणी इतर अनेकांसारखीच! पण दिलीप चित्रे या मुक्त, हरहुन्नरी माणसाला इथून पुढे अमेरिकेने असं काही हृदयाशी धरलं, की पूर्वेचं अस्सल मराठी अस्तर असलेल्या चित्रे यांच्या मना-स्वभावात पश्चिमेने आपलेही रंग मुक्तहस्ते मिसळून दिले...त्या संस्कृतीसंकरातून एक सुंदर, सुरेल मैफल आकाराला आली. पासपोर्टचा रंग बदलताना गळ्यात आलेला आवंढा गिळून ‘अमेरिकन’ होण्या-असण्याची आव्हानं पेलणं त्या ‘जागतिकीकरणपूर्व’ काळात किती दुष्कर होतं, याची कल्पना आजच्या ‘ग्लोबल’मनांना येणं कठीणच! चित्रे यांनी त्यांची पत्नी शोभाच्या सोबतीने हा अवघड टप्पा तर निभावलाच.. पण अमेरिकन होऊनसुध्दा आपलं आणि इतरांचंही ‘मराठीपण’ शोधण्या-जपण्या-वाढवण्याचे मार्गही त्या ‘इंटरनेटपूर्व काळा’त नेटाने हुडकून काढले.

 

‘लष्करच्या भाकरी भाजणे’ हा मराठी वाक्प्रचार अख्ख्या जगाच्या पाठीवर कुठे कृतीत उतरला असेल, आणि तब्बल पन्नासहून अधिक वर्षं अतीव आनंदाने साजरा झाला असेल, तर तो वॉशिंग्टनमधल्या दिलीप-शोभा चित्रे यांच्या घरी. सुरुवाती-सुरुवातीला अमेरिकेच्या उपनगरांमध्ये नव्या नव्या येणाऱ्या कित्येक कोवळ्या मराठी जोडप्यांच्या पहिल्या भाकऱ्या चित्रे यांच्या घरातच तव्यावर पडल्या. पुढे अमेरिकाभरच्या महाराष्ट्र मंडळांचे संसार उभे करण्यापासून खिशात एक डॉलर नसताना अमेरिकेत चक्क मराठी चित्रपट महोत्सव भरवण्याची सगळी उस्तवार मोठ्या हिकमती लढवून ज्याने पार पाडली त्या माणसाचं नाव दिलीप चित्रेच. ‘घाशीराम कोतवाल’चा अख्खा संच अमेरिकाभर प्रयोग करत हिंडला, तेव्हा त्या दौऱ्याचा खर्च वाचवण्यासाठी या सगळ्यांचे गावोगावच्या घरोघरी वार लावून देण्याचं चोख प्लॅनिंग चित्रे यांचं... आणि पाडगावकर-बापट-माडगूळकर-मधुकाका-श्रीपु भागवत अशा कलंदरातल्या किचकट सारस्वतांना आपापल्या बैगेत आपापली पुस्तकं भरून अमेरिकेत येण्याचं आवतण देण्याची हिंमत करू धजले तेही चित्रेच!

 

गीतरामायणाने अमेरिकनांनाही वेड लावणाऱ्या बाबुजींच्या संतापी प्रेमाचे उत्कट किस्से, पाय मुरगळला म्हणून फुरंगटून बसलेल्या एका हॉट मराठी अभिनेत्रीचे अ‍ॅटमबॉम्ब नखरे जिरवल्याच्या मादक कहाण्या, सारस्वतांच्या ‘तीर्थप्राशना’चे रसभरीत अध्याय, अमेरिकेतले यजमान नोकरीवर गेल्याची संधी साधून त्यांच्या खुल्या बारमधल्या बाटल्या लांबवणाऱ्या - भारतातल्या घरी तासतास फोन करून बिलं फुगवणाऱ्या फुकट्यांच्या कहाण्या... अशा अगणित किश्श्यांनी भरलेली आपली पन्नास-साठ वर्षांची पोतडी खुली करायला घेतली की चित्रे रंगून जात... गप्पांची मोठी बहार उडे आणि ऐकणारा थक्क होई. अशावेळी वाटे, हे इतकं सगळं कधी आणि कसं जमवलं असेल या माणसाने?

 

पण हे इतकंच नव्हतं.अपरिमित कष्ट, अकटोविकटीचं नियोजन, सुधीर फडके यांच्यासारख्या पाहुण्याला गाडीतून नेताना झालेल्या जीवघेण्या अपघातासारख्या संकटांनाही न भिण्याचं भलतं धाडस आणि अमेरिकेत मराठी साहित्य-संस्कृतीसाठीचे कार्यक्रम आयोजित करताना कशालाही हार न जाणारी चिवट वृत्ती... दिलीप चित्रे हे रसायन मोठं विलक्षण होतं.देशाबाहेर राहाणाऱ्या मराठी माणसांच्या अनुभवांना मराठी साहित्यात जागा नाही म्हणून रडकथा गाणारे अनेक होते. पुढाकार घेतला तो चित्र्यांनी. सत्तरीच्या दशकाच्या उत्तरार्धात म्हणजे ईमेल-पूर्व काळात त्यांनी एक भलता घाट घातला आणि मोठ्या चिकाटीने तडीला नेला. जगभर पसरू लागलेल्या मराठी माणसांमधले ‘लेखक’ हुडकून त्यांना लिहायला लावून त्या एकत्रित कथांचा संग्रह त्यांनी संपादित केला, त्या पुस्तकाचं नाव ‘कुंपणापलीकडले शेत’!

 

- पण कुंपणाच्या पलीकडे एरवी जोमाने वाढणाऱ्या या शेतात रुजत चाललेल्या कृतक सांस्कृतिक अपराधगंडाचं तण खणून काढण्याची हिंंमत करणारा कुंपणाबाहेरचा पहिला माणुस पुन्हा तोच होता : दिलीप चित्रे!

 

अमेरिकेत जन्मलेल्या-तिकडेच वाढलेल्या आपल्या मुलांना रामरक्षा येत नाही म्हणून खंतावलेल्या, युरोप-अमेरिकेत संसार मांडले तरी मराठीच गाणी, मराठीच संस्कृती, मराठीच वरण-भात आणि मराठीच मूल्यांचा वृथा हट्ट धरून सतत लटकतं, अधांतरी आयुष्य जगणाऱ्या कित्येक कुटुंबांना देशांतराच्या समकालीन वास्तवाची रोकडी जाणीव करून देणारं ‘अलीबाबाची हीच गुहा’ हे चित्रे यांनी लिहिलेलं नाटक! ‘तुमच्या मुलांना ज्ञानेश्वर-तुकाराम माहिती नसले म्हणून काही बिघडत नाही. ‘इकडे’ आहात, तर ‘इकडच्यासारखं’ जगा, माहेरची उसनवारी आता फार झाली!’ असं सुनावण्याची हिंमत करून चित्रे यांनी या नाटकातून ‘अलीबाबाच्या गुहेचं दार आता बंद झालं आहे. परतीचा मार्ग बंद!!’- असं जाहीर ऐलानच करून टाकलं... आणि कहर म्हणजे ‘काय बाई, चातुर्मासात सुध्दा गोमांस खाता का अमेरिकेत?’ म्हणून खऊट शेरेबाजी करणाऱ्या देशी नातलगांच्या नाकावर टिच्चून मुंबै-पुण्यात या नाटकाचे प्रयोगसुध्दा केले.

 

चित्र्यांनी काय नाही केलं? दहा हजार मैल अंतरावरची दोन जगं सहज जोडणारा पूल उभा केला, अतीव उत्कट अनुभवांच्या आभाळाला कवेत घेणाऱ्या कविता लिहिल्या, अनुवाद केले, संपादनं केली, गाणी लिहिली, पत्नीहून अधिक सखी असलेल्या शोभाताईंच्या लेखनाला खतपाणी घालून वाढवलं, प्रवास केले, नातवंडांशी गट्टी जमवली, जगभरचे मित्र जमवले, मैत्र जपलं, कुणाकुणासाठी जीव उधळला, पर्वताएवढी उंच माणसं पाहिली आणि क्वचित त्यांच्यातलं खुजेपण दिसलं तेव्हा ते नजरेआड करण्याची दिलदारीही दाखवली!

 

-आता दिलीप चित्रे नाहीत. नसतील. त्यांची आठवण काढण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मित्र-मैत्रिणींना एकत्र जमवणं, खाण्या-पिण्याची जय्यत सज्जता करणं, कविता-गाणी-गप्पांची बहार उडवणं आणि सगळ्यांनी मिळून खळखळून हसणं!- हसता हसता डोळा पाणी आलं, तरी ते कुणाला दिसू न देणं!!!