शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

वादळाचा प्रवास!

By admin | Updated: May 18, 2014 00:34 IST

‘हम बदला नही चाहते, हम बदलाव चाहते है’ अशी विचारसरणी ठेवणारे नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी भारताच्या लोकशाहीत इतिहासाचे नवीन पान रचले आहे.

‘हम बदला नही चाहते, हम बदलाव चाहते है’ अशी विचारसरणी ठेवणारे नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी भारताच्या लोकशाहीत इतिहासाचे नवीन पान रचले आहे. भारतातील लोकशाही किती सशक्त आणि सर्वसमावेशक आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी. 2क्क्1 साली सत्तेच्या राजकारणात आलेले मोदी देशाच्या निवडणुकांचे केंद्रस्थान झाले. गुजरातमधील वाडनगर येथून निघालेले हे वादळ नवी दिल्लीतील ‘7 आरसीआर’ या पंतप्रधानांच्या निवासस्थानी लवकरच धडकेल. तो मार्ग शुक्रवारच्या निकालाने स्पष्ट झाला आहे. एका लहानशा गावातील चहाविक्रेत्याचा मुलगा आता देशाच्या पंतप्रधानपदी बसणार आहे. मोदी या नावाभोवती जसे वलय आहे तसेच टीका, वाद यांची सावलीदेखील आहे. असंख्य अडचणींचा सामना करणारे मोदी आतून प्रचंड शांत आहेत. वादळाच्या काळातून, अनंत अडीअडचणीतून ते बाहेर पडले. याचे कारण त्यांच्या आतल्या शांततेत असावे. 
 
शिस्तबद्ध एन.डी.
अभ्यासात सर्वसाधारण विद्यार्थी असलेल्या नरेंद्र मोदी यांचे शिक्षण बी.एन. हायस्कूल येथे झाले. शाळेत असताना ‘एन.डी.’ म्हणून परिचित होते. एनसीसीचे कॅडेट असल्याने सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध आयुष्य, पोहण्यातदेखील तरबेज.
 
मोदी लहानपणी वडिलांच्या चहाच्या ‘स्टॉल’वर मदत करण्यात पुढाकार घ्यायचे व वाडनगर रेल्वे स्थानकात चहा विकायचे. घरची परिस्थिती बेताचीच असतानादेखील 1965 च्या भारत-पाक युद्धादरम्यान सीमेवर जाणा:या सैनिकांना मोफत चहा देण्यात ते सर्वात पुढे होते. 
 
वयाच्या 17 व्या 
वर्षी जशोदाबेन यांच्याशी पालकांच्या आग्रहाखातर मोदी यांनी विवाह केला. परंतु ते आपल्या पत्नीसमवेत कधीही राहिले नाहीत. वयाच्या 17 व्या वर्षी कुमाऊं येथील पर्वतराजींकडे त्यांची पावले वळली.  
 
संघात सक्रिय झाल्यानंतर सुरुवातीला मोदींकडे वरिष्ठ पदाधिका:यांसाठी चहा, नाश्ता बनविण्याची जबाबदारी होती. याशिवाय 8 ते 1क् खोल्यांना झाडून साफसफाईदेखील ते करायचे. संघात असल्यापासून त्यांना पहाटे 5 वाजता उठून योगासन करण्याची सवय जडली ती कायमची. 
 
दररोज सकाळी ‘आयपॅड’वर 15 मिनिटे ते वर्तमानपत्र वाचतात. डिजिटल डायरी घेणा:या पहिल्या राजकारण्यांमध्ये त्यांचा समावेश आहे, हे विशेष. मोदी संपूर्णपणो शाकाहारी आहेत. गेल्या 
12 वर्षापासून त्यांनी एकदाही सुटी घेतलेली नाही.
 
लहानपणापासूनच मोदी यांना टापटीप राहण्याची आवड आहे. बेताचीच स्थिती असूनदेखील ते जास्त कष्ट करून चांगले कपडे विकत घ्यायचे. शॉर्ट कुर्ती हा त्यांचा सर्वात आवडता पेहराव. शिवाय ‘स्विस’ घडय़ाळे व मॉन्टब्लँक पेनदेखील आवजरून वापरतात. मोदी हे नियमितपणो लेखनदेखील करतात. ते स्वत: एक कवी असून, पर्यावरण व देशभक्तीवर त्यांनी गुजरातीमध्ये अनेक कविता लिहिल्या आहेत.
 
हुकमी एक्का
गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री असलेले अमीत शहा हे ‘टीम मोदी’ मधील सर्वाधिक विश्वासू सरदार. मोंदीचे सर्व राजकीय आखाडे त्यांच्याच मदतीने पूर्णत्वास जातात. 198क् साली सर्वप्रथम ते मोदींना भेटले. राज्य निवडणूकीच्या ‘प्लानिंग’ पासून ते सहकार क्षेत्र व गुजरात क्रिकेट असोसिएशनर्पयत सर्वच क्षेत्रत वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपाला शहांची मदत झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत मोदींच्या वाराणशीतील ऐतिहासिक विजयाचे शहा शिल्पकारच ठरले. 
 
विश्वासू सनदी अधिकारी 
गुजरातमधील सर्वात पॉवरफूल सनदी अधिकारी के. कैलाशनाथन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत. हे पद खास त्यांच्यासाठी मोदींनी  तयार केले. दाक्षिणात्य असलेले के. के. यांचा दक्षिणोकडील राज्यांमधील पक्षांशी समन्वय साधण्यासाही मोदी यांना उपयोग होतो.
 
कायदेशीर सल्लागार 
1985बॅचचे सनदी अधिकारी असलेले गिरीश मुमरू हे मोदींचे मुख्य सचिव असून राज्य सरकारच्या सर्व कायदेशीर बाबी सोडविण्याची कामगिरी ते करतात. गुजरात दंगलीपासून लोकायुक्तर्पयत सर्व गंभीर घटना मुमरू यांनी हाताळल्या आहेत.  मुख्यमंत्री कार्यालयात शहरी विकास व महसूल विभाग सांभाळणारे मुमरू दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. 
 
पैशांची बँक
‘काका’ म्हणून ओळखले जाणारे  सुरेंद्र पटेल गेल्या दोन दशकांपासून भाजपासाठी पैसे उभी करणारी ‘बँक’ म्हणून काम पाहतात. काकांनी निधीची मागणी केल्यास गुजरातचे उद्योजक त्यांना का? म्हणून विचारत नाहीत हे विशेष. अडवाणींच्याही जवळ असणारे काका हे भाजपाचे राज्यातील खजिनदार असून यापुढेही ते गुजरातमध्ये राहून पक्षाच्या राष्ट्रीय खर्चावर लक्ष ठेवतील. 
तरुण चेहरा
मुख्यमंत्री कार्यालयातील संयुक्त सचिव असलेले विजय नेहरा मोदींच्या टीममधील सर्वात तरूण चेहरा आहे. आयआयटी पदवीधर असलेला विजय आनंदीबेन पटेल यांच्याबरोबरच गुजरातमध्येच राहू शकतो. 
मोदींचे सल्लागार
गुजरातमधील टोरंट समुहाचे उपाध्यक्ष वी. चौटीवाले नागपूरपासून संघाशी संलग्न आहेत. विविध विषयांवर मोदी चौटीवाले यांच्याशी सल्लामसलत करतात. मोदींनी केलेल्या विनंतीमुळेच चौटीवाले यांनी दिल्लीमध्ये मोदी यांना प्रचारासाठी मदत केली होती. यापुढेही ते मोदी यांना सल्लागार म्हणूनच भूमिका बजावतील. 
 
तंत्रज्ञानातील ‘त्रिदेव’
मोदींच्या यशस्वी विकास मोहिमेत तंत्रज्ञानासाठी सर्वतोपरी मदत करणारे तीन तांत्रिक सल्लागार म्हणजे हिरेश जोशी, राजेश जैन आणि बी. जी. महेश.  मोदींची थ्रीडी मोहिम राबविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे  जोशी सीएमओ कार्यालयात विशेष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर राजेश जैन (मुंबई) आणि महेश (बंगळूर) हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील उद्योजक जोशी यांच्याबरोबर काम करतात. या तिघांपैकी जोशींचे दिल्ली जाणो नक्की असून जैन आणि महेशही मोदींच्या नव्या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावतील. 
 
डोळे आणि कान
दिल्लीतील गुजरात राज्याचे निवासी आयुक्त भारतलाल हे गेल्या चार वर्षापासून मोदींचे ‘डोळे आणि कान’ समजले जातात. त्यांचे विविध राजकारण्यांशी चांगले संबंध असून माध्यम आणि सरकारी अधिका:यांसमवेतही दुवा म्हणून  ते काम पाहतात. यापुढे मोदींबरोबर दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात त्यांना नियुक्ती मिळू शकते. 
संकटमोचक
‘व्हायब्रंट गुजरात’ मोहिमेच्या यशामागे सनदी अधिकारी अरविंद शर्मा यांची भूमिका महत्वाची होती. या मोहिमेतील यशामुळेच मोदींची ‘विकासपुरूष’ म्हणून ओळख झाली. उत्तर प्रदेशातील आझमगड व अलाहबाद या शहरांमध्ये शर्मा यांचा चांग़ला प्रभाव असून संकटमोचक म्हणून त्यांना ओळखले जाते. यापुढे दिल्लीत राहून पंतप्रधान कार्यालयात काम करून खासदांराशी संबधीत व इतर जबाबदा:या ते हाताळू शकतात. 
 
वंडर बॉय
अमेरिकेत शिकलेल्या अवघ्या 3क् वर्षीय प्रशांत किशोर या वंडर बॉयने अल्पावधीतच ‘टीम मोदी’ मध्ये स्थान व विश्वास मिळवला आहे. मोदींच्या मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्या:या किशोरने यंदाच्या निवडणूकीत अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक प्रचाराच्या धर्तीवर प्रचार मोहिमेची आखणी करून मोदींचा विजय सोपा केला.  तसेच आयआयटी विद्याथ्र्याना त्यांच्या नोक:या सोडून मोदींच्या टीममध्ये काम करण्यासाठी मन वळविण्यामध्येही मोठी कामगिरी बजावली. राजकीय विषयांवर मोदींना सल्लागार म्हणून कामगिरी बजावणारा किशोर सहकारी पक्षांसमवेतही समन्वय साधण्यात महत्वाची भूमिका बजावतो. यापुढे ‘ब्रँड मोदी’ ची इमेज आणखी मजबूत करण्यासाठी मोदी किशोरला पंतप्रधान कार्यालयातही काम करण्याची संधी देऊ शकतात. 
 
गुरु विरुद्ध शिष्य
मोदी यांच्या प्रगतीत लालकृष्ण आडवाणी यांचा मोठा वाटा राहिला आहे. आडवाणींमुळेच मोदी यांनी भाजपात प्रवेश केला व त्यांच्याच मार्गदर्शनामुळे ते गुजरातचेदेखील मुख्यमंत्री झाले. परंतु 2क्1क् नंतर आडवाणी व मोदी यांच्यातील 3क् वर्षाच्या संबंधात दरी निर्माण व्हायला लागली.
 
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या ‘एसआयटी’ने गुजरात दंगलींच्या प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिल्यानंतर 2क्11 साली मोदी यांनी सद्भावना मिशन यात्र आयोजित केली. आपली छबी बदलावी हा प्रयत्न यामागे होता. 
 
याच काळात भ्रष्टाचाराविरुद्ध सोमनाथ येथून रथयात्र काढण्याच्या आडवाणींच्या प्रयत्नांना मोदी यांनी सहकार्य केले नाही. आडवाणी यांनी मोदींचे विरोधक नितीश कुमार यांच्या उपस्थितीत बिहारमधून यात्र काढली. अलिकडे पंतप्रधानपदावरुनही दोघांमधील संबंध ताणले गेले.