शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची वेतनवाढ योजना रोखली

By admin | Updated: July 26, 2016 05:08 IST

महापालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वी शिवसेनेला दणक्यावर दणके बसू लागले आहेत़ मित्रपक्ष भाजपाच प्रतिस्पर्धी झाला असताना आता पालिका प्रशासनाने शिवसेनेच्या

मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वी शिवसेनेला दणक्यावर दणके बसू लागले आहेत़ मित्रपक्ष भाजपाच प्रतिस्पर्धी झाला असताना आता पालिका प्रशासनाने शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर हल्ला चढविला आहे़ मराठी विषयात एम़ ए़ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढ देण्याची पाच वर्षांपूर्वीची योजनाच आयुक्तांनी गुंडाळली आहे़ यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे़महापालिकेच्या कामकाजातील मराठी टक्का वाढविण्यासाठी मराठी विषयात एम़ ए़ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय मार्च २००९ मध्ये घेण्यात आला़ मराठीचा मुद्दा घेऊन लढणाऱ्या शिवसेनेने २०११ मध्ये ही योजना आणली़ मात्र या योजनेचा लाभ घेऊन जादा वेतनवाढ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धाच सुरू झाली़ त्यामुळे डॉक्टर, अभियंता तसेच अन्य तांत्रिक वर्गातील कर्मचारीही मराठी विषयातून पदव्युत्तर प्रशिक्षण घेऊ लागले़ याचा फटका पालिकेच्या तिजोरीला बसला़ आस्थापना खर्चामध्ये वाढ होऊ लागली़ लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून ही योजना आणण्यात आली होती़ मात्र याचा लाभ अन्यच कर्मचारी घेऊ लागले, त्यामुळे या योजनेचा पालिकेला फायदा होऊ शकला नाही़ परिणामी ही योजनाच गुंडाळण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे़ याबाबतचा अहवाल विधी समितीपुढे लवकरच मांडण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)आस्थापना खर्च वाढलाआर्थिक डोलारा मजबूत ठेवण्यासाठी आस्थापना खर्च मर्यादित ठेवणे आवश्यक असते़ कोणत्याही कंपनी अथवा सरकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा सर्वाधिक भार असतो़ आस्थापना खर्च वाढला, की त्या संस्थेचा आर्थिक कारभार डगमगतो़ आस्थापना खर्च वाढत गेल्यामुळे १५ वर्षांपूर्वी महापालिका आर्थिक संकटात आली होती़ अतिरिक्त वेतनावाढमुळे हाच परिणाम पुन्हा होऊ लागला आहे़वादळी चर्चेची शक्यतामराठी अजेंडा घेऊन आत्तापर्यंत शिवसेना लढली आहे़ ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी योजना बंद केल्यास चुकीचा संदेश जाईल, अशी भीती शिवसेनेला वाटते आहे़ त्यामुळे बुधवारी हा विषय विधी समितीपुढे आल्यानंतर त्यावर वादळी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे़शिवसेनेला फटका : ही योजना शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक होती़ पालिका प्रशासनाने ऐन निवडणुकीच्या काळात ती रद्द ठरविल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे़ कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देऊन जनतेच्या पैशांचा अपव्यय कशाला, असा उपरोधक टोला प्रशासनाने विधी समितीसमोर प्रस्तावात लगावला आहे़