शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सुपे येथे पाण्यासाठी रास्ता रोको

By admin | Updated: May 19, 2016 01:52 IST

येथील गावठाण तलावामध्ये शासनाने टंचाईमधून जनाई उपसासिंचन योजनेचे पाणी सोडावे

सुपे : येथील गावठाण तलावामध्ये शासनाने टंचाईमधून जनाई उपसासिंचन योजनेचे पाणी सोडावे, यासाठी सुपे चौकात चौफुला-मोरगाव रस्त्यावर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. १७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी सुमारे तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोरगाव व चौफुला रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. वरवंड तलावातून पाणी सोडल्यास जिरायती भागातील टँकर भरण्याचा प्रश्न मिटणार असून टंचाई निवारणासाठी मदत होणार आहे. दुष्काळ जाहीर झाला असतानाही यापूर्वी ग्रामस्थांनी लोकसहभागातून अडीच लाख रुपये गोळा करून तलावात पाणी घेतले होते. मात्र शासनाचे याकामी दुर्लक्ष होत असल्याची टीका शंकरराव चांदगुडे, बी. के. हिरवे, पोपटराव पानसरे, मनोज काळखैरे, मामा दरेकर, रघुनाथ कुतवळ, सोपानराव भोंडवे, तानाजी खोमणे, अशोक धेंडे आदींनी आपल्या मनोगतातून केली. या वेळी युती शासनाच्याविरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. होळकर म्हणाले, की सध्याचे सरकार हे बारामती तालुक्याला सापत्नपणाची वागणूक देत आहे. चारा डेपो, चारा छावणी, टँकर, जनावराचे पाणी व जवाहर विहीर इत्यादीबरोबर अनेक गोष्टीपासून तालुक्याला वंचित ठेवत आहे. तसेच पुरंदर उपसा, जनाई-शिरसाई उपसासिचंन योजनेला पाणी न सोडल्यामुळे टंचाईमध्ये अधिकची भर पडली आहे. सरकारच्या धोरणांना शेतकरी पुरता वैतागला आहे. या सरकारने शेतकऱ्यांचे त्वरित १०० टक्के कर्ज व वीज बिल माफी करावी, अशीही मागणी होळकर यांनी त्या वेळी केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या अध्यक्षतेखाली या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नायब तहसीलदार पाटील व जनाई योजनेचे उपअभियंता आर. एन. सालगुडे यांना पाणी सोडण्याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले. याप्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पंचायत समितीचे सभापती करण खलाटे, उपसभापती दत्तात्रय लोंढे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन दत्तात्रय कुतवळ, ज्ञानेश्वर कदम, शंकरराव चांदगुडे, भरत खैरे, अप्पासाहेब शेळके, राजेंद्र रायकर, संपतराव जगताप, रघुनाथ कुतवळ, तानाजी खोमणे, बी. के. हिरवे, संजय दरेकर, अंकुश रसाळ, सुरेश रसाळ, बबनराव वाघ, संपतराव काटे, दादा पाटील, शफीक बागवान, नंदाताई खैरे, संजय पोमण, बापूराव गवळी, संजय गाडेकर, राहुल वाबळे, गणेश चांदगुडे, राजेंद्र जाधव, पोपट तावरे, हनुमंत भापकर, यादवराव कुदळे, बापूराव चांदगुडे, रवींद्र भापकर, वनिता चौधरी, गावोगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, युवकचे कार्यकर्ते व ग्रामस्थ आदी आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)