ऑनलाइन लोकमतचाकण, दि. 29 - मराठा समाजातील तरुणांना शिक्षण व नोकरीत आरक्षण, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी अशा विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मंगळवार ३१ जानेवारीला सकाळी १० वाजता चाकण येथील तळेगाव चौकात पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सगळ्या पक्षांच्या कुबड्या बाजूला ठेवून मराठा समाजातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे. शिक्षण घेताना आणि नोकरीला लागताना आरक्षण नसल्याने तरुणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून, मराठ्यांनी कोणत्याही जाती धर्मावर टीका न करता शांततेत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आले.
पुणे-नाशिक महामार्गावर मराठा क्रांती मोर्चाचा ३१ जानेवारीला रास्ता रोको
By admin | Updated: January 29, 2017 20:37 IST