शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर पार्कचा पाणीपुरवठा बंद करा

By admin | Updated: September 6, 2015 01:34 IST

राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने त्वरित बंद करावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादीच्या वतीने केली आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर केवळ गरजेपुरता करावा, यासाठी पक्षाच्या वतीने पाणीबचतीबाबत जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम वाया तर गेला आहेच, त्याचबरोबर राज्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट फोफावलेले आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यावर खबरदारी म्हणून आतापासूनच पाणी जपून वापरण्याची गरज असल्याचे पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी सांगितले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एकही तलाव यंदा भरलेला नाही. त्यातच मान्सूनही १५ दिवस आधीच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याने मुंबईला पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकणार नाही. ही बाब लक्षात घेता वर्षभराचा विचार करून वॉटर पार्क, मॉल्सना पुरविला जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, केवळ पिण्यासाठीच पाणी वापरले गेले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास मोठी बचतमुंबईत गाड्या धुण्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्याचप्रमाणे शौचालयातील फ्लशसाठी शेकडो लीटर पाणी लागते. घरात होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर टाळल्यास पाण्याची मोठी बचत करता येऊ शकते, याबाबत मुंबईकरांमध्ये जागृती आणण्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये मोहीम राबविण्यात येणार असल्याचे अहिर यांनी सांगितले.