शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आरक्षित आसनांच्या’ दबंगिरीला बसणार आळा

By admin | Updated: August 27, 2015 04:38 IST

लोकल डब्यातील आसने आधीच आरक्षित करुन अन्य प्रवाशांना अडथळा निर्माण करणाऱ्या टोळक्यांना आळा घालण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेच्या आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) घेण्यात आला आहे.

- सुशांत मोरे,  मुंबई लोकल डब्यातील आसने आधीच आरक्षित करुन अन्य प्रवाशांना अडथळा निर्माण करणाऱ्या टोळक्यांना आळा घालण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेच्या आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल) घेण्यात आला आहे. यासाठी एक विशेष प्लॅनिंग आरपीएफकडून तयार करण्यात आले असून २५ आरपीएफ जवान काही स्थानकांवर तैनात केले जाणार आहेत. त्याची १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी केली जाईल, अशी माहीती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा (पश्चिम रेल्वे-मुंबई) यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये काही प्रवासी आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींसाठी जागा अडवून ठेवतात. अन्य प्रवाशाने त्या जागेवर बसण्याचा प्रयत्न केल्यास वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्याचे रुपांतर काही वेळा हाणामारीतही होेते. या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम रेल्वे आरपीएफकडे बऱ्याच तक्रारी दाखल होत आहेत. त्याविरोधात कारवाईही करण्यात येते. या परिस्थितीत फार फरक पडलेला नाही. यासाठी पश्चिम रेल्वे आरपीएफतर्फे २५आरपीएफ जवान तैनात केले जाणार आहेत. वांद्रे, अंधेरी, बोरीवली, विरार स्थानकांवर गर्दीच्या वेळेत हे जवान तैनात असतील. यातील काही जवान हे साध्या वेषात तैनात असणार आहेत. काही जवान लोकलमधून या स्थानकादरम्यान प्रवासही करणार आहेत. विरार ते बोरीवली स्थानकादरम्यान आरपीएफच्या जवानांची नजर राहणार आहे. या जवानांमध्ये काही महिला जवानही असणार आहेत. डब्यातील दबंगिरी वाढली असून त्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे याविरोधात कारवाई करण्यासाठी हे पथक तैनात केले जाईल. १ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होईल, असे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त लोकल आनंद झा यांनी सांगितले.