शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळ्यात रेल रोको

By admin | Updated: January 20, 2017 04:44 IST

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बजावलेल्या कारवाईच्या नोटिशीविरोधात रहिवाशांनी गुरुवारी दुपारी टिटवाळा स्थानकात रेल रोको केला.

डोंबिवली/टिटवाळा : आरक्षित भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने बजावलेल्या कारवाईच्या नोटिशीविरोधात रहिवाशांनी गुरुवारी दुपारी टिटवाळा स्थानकात रेल रोको केला. पालिकेच्या निषेधासाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जवळपास पाऊण तास रेल्वे वाहतूक ठप्प होती. टिटवाळ्यातील इंदिरा नगर, आंबेडकर नगर आणि नांदप रोड परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हे आंदोलन केले. अ‍ॅम्युझमेंट पार्क आणि महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे क्वॉर्टर्स बांधण्यासाठी हे भूखंड आरक्षित आहेत. हे अतिक्रमण हटविण्यासाठी रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आंदोलनकर्त्यांनी दोन्ही मार्गांवरील रुळावर ठाण मांडल्याने लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे कसाऱ्याहून कल्याणच्या दिशेने अप तसेच कल्याणहून आसनगावच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक सपशेल कोलमडली. परिणामी, ठाण्यापर्यंतची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल रोकोची शक्यताही नसल्याने लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे पोलीस दलाची पुरेशी तयारी नव्हती. त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. स्थानिक पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली. नोटिसा बजावल्याने संतप्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. रोष व्यक्त करण्यासाठी अधिकारी सापडले नाहीत, म्हणून त्यांनी रेल रोको करत निषेध व्यक्त केला. जमाव प्रचंड असल्याने, त्यात महिलांचे प्रमाण मोठे असल्याने ट्रॅकवरून नागरिकांना हटवताना सुरक्षा यंत्रणेच्या नाकीनऊ आले होते. स्थानकातील दोन्ही फलाटांवर लोकल अडकल्या होत्या. या गोंधळामुळे कसारा, आसनगावसह टिटवाळा मार्गावरील असंख्य प्रवासी ताटकळले होते. टिटवाळा, आंबिवली आणि शहाड स्थानकातील प्रवासी रस्त्यामार्गे कल्याणला आल्याने त्यांची गैरसोय झाली नाही. पण अनेकांच्या खिशाला या घटनेमुळे कात्री बसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण होते. अखेरीस संध्याकाळी ४.३२च्या सुमारास रेल रोकोनंतर पहिली लोकल कल्याणच्या दिशेने धावल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दिली. लोकल वाहतूक सुरू झाली तरीही जमाव स्थानक परिसरातून न हटल्याने तणाव कायम होता. अखेरीस संध्याकाळी ४.५०च्या सुमारास दोन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक सुरू झाल्याने रेल्वे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)।प्रवाशांना त्रासनोटीस बजावल्याने संतप्त नागरिकांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. रोष व्यक्त करण्यासाठी अधिकारी सापडले नाहीत, म्हणून त्यांनी रेल रोको करत निषेध व्यक्त केला. जमाव प्रचंड असल्याने व त्यात महिलांचे प्रमाण मोठे असल्याने ट्रॅकवरून नागरिकांना हटविताना सुरक्षा यंत्रणेच्या नाकीनऊ आले होते. स्थानकातील दोन्ही फलाटांवर लोकल अडकल्या होत्या.