शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीजवळ रेल रोको

By admin | Updated: January 13, 2017 04:21 IST

पश्चिमेतील कोपर रोड मार्गावरील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात रेल्वे प्रशासनाने नोटीस देत

डोंबिवली : पश्चिमेतील कोपर रोड मार्गावरील सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात रेल्वे प्रशासनाने नोटीस देत, झोपड्यांवर गुरुवारी कारवाईचा प्रयत्न केला. या वेळी संतप्त झालेल्या शेकडो झोपडीधारकांनी त्याला विरोध करण्यासाठी रेल रोको केला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक दुपारी १२.१४ ते १२.४० दरम्यान विस्कळीत झाली. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी रेल रोको झाल्याने, प्रशासन व प्रवासी हैराण झाले.पश्चिमेला अनेक वर्षांपासून सिद्धार्थनगर झोपडपट्टी आहे. राज्य सरकारने १९९५ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्या आहेत. आमच्या झोपड्याही त्यापूर्वीच्याच आहेत, असा दावा रहिवाशांनी केला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची कारवाई योग्य नाही. प्रशासनाच्या दंडेलशाहीचा निषेध करण्यासाठी हा रेल रोको केल्याचे रहिवाशांनी सांगितले.झोपडीधारक मोठ्या संख्येने एकत्रितपणे रेल्वे रुळांवर उतरल्याने, आधी धिम्या, नंतर जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. उद्घोषणा यंत्रांवरून नेमकी कोणती सूचना द्यायची, असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला. त्यामुळे बहुतांशी स्थानकांत वेळापत्रकानुसार लोकल न आल्याने गोंधळाचे वातावरण होते. डोंबिवली, कल्याण आणि दिवा, तसेच ठाणे स्थानकात दुपारच्या वेळेस तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)