शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बेमुदत काळापर्यंत सोनोग्राफी बंद

By admin | Updated: September 2, 2016 01:32 IST

प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) अर्थ वेगळा लावून अधिकारी निर्दोष रेडिओलॉजिस्टवर अन्याय करत असल्याविरुद्ध, गुरुवारी रेडिओलॉजिस्टनी

मुंबई : प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) अर्थ वेगळा लावून अधिकारी निर्दोष रेडिओलॉजिस्टवर अन्याय करत असल्याविरुद्ध, गुरुवारी रेडिओलॉजिस्टनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनकडून (आयआरआयए) सांगण्यात आले. मात्र, सरकारकडून कोणताही सरकारी प्रतिसाद न आल्यामुळे उद्यापासून बेमुदत काळासाठी सोनोग्राफी सेवा रेडिओलॉजिस्ट बंद ठेवणार आहेत, पण रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून एक्सरे, एमआरआय, सीटीस्कॅन आणि अन्य सेवा सुरू राहणार आहेत. या संपामुळे काही प्रमाणात रुग्णसेवेवर परिणाम झाला. मात्र, शासकीय, पालिका रुग्णालय सुरू असल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले नाहीत. देशातील १५ हजार, राज्यातील ४ हजार, तर मुंबईतील १ हजार २०० रेडिओलॉजिस्ट संपात सहभागी झाले होते. रेडिओलॉजिस्टने पुकारलेल्या संपाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे बेमुदत सोनोग्राफी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयआरआयएच्या डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने आजच्या दिवसात ‘मागण्या पाहिल्या’ इतकीच प्रतिक्रिया दिली, पण आमच्या मागण्यांवर उत्तर दिले नसल्यामुळे संप सुरूच राहणार असून, उद्यापासून बेमुदत काळापर्यंत सोनोग्राफी बंद राहाणार आहे. मुंबईतील रेडिओलॉजिस्टनी महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांची भेट घेतली. या भेटीत पीसीपीएनडीटी कायद्याच्या तरतुदींमध्ये बदल करण्याची मागणी करण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनातील बाबींचा विचार करण्यात येईल. त्यावर चर्चा करून बदलाची आवश्यकता असल्यास त्याविषयी सरकारशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. केसकर यांनी दिल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)रेडिओलॉजिस्टच्या मागण्या - कारकुनी त्रुटींसाठी सोनोग्राफी मशिन सील करू नये आणि वैद्यकीय पात्रता रद्द करू नये. - फॉर्म एफमधील कारकुनी चुका, अ‍ॅप्रन न घालणे, नोटीस बोर्ड नसणे, पीसीपीएनडीटी कायद्याचे पुस्तक समोर नसल्यास गर्भलिंगनिदान केल्याचे समजून फौजदारी गुन्हा दाखल करू नये. - २०१२ च्या राजपत्रातील सूचनेनुसार दोनपेक्षा जास्त सोनोग्राफी सेंटरवर जाण्यास डॉक्टरांवर निर्बंध घालावेत. - न्यायालयात दोषी ठरत नाही, तोपर्यंत रेडिओलॉजिस्टची नोंदणी रद्द करू नये. बदलीसाठी एक महिना नोटीस देण्याची सक्ती काढून टाकावी. - कारकुनी चुकांसाठी फौजदारी गुन्ह्याखाली सुरू असलेल्या सर्व केस वगळाव्यात.