शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चायना मोबाईलची विक्री थांबविली

By admin | Updated: July 10, 2017 18:45 IST

भारत व चीनच्या तणावाच्या पाश्र्वभूमीवर जळगावात नगरसेवकाकडून जनजागृतीपर पत्रकाचे वाटप; गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनने केला चायना मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प

ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.10- डोकलाम मध्ये भारतीय सैन्याने तळ ठोकल्याने चीनने भारताविरूद्ध युद्ध पुकारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ जळगावात चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जनजागृतीपर पत्रके वाटप सुरु केले आहे. तर सोमवारी गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनने चायना कंपनीचे मोबाईल व वस्तूंची विक्री न करण्याचा संकल्प केला आहे. 
चीनकडून भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण झालेला आहे. एकीकडे पाकिस्तानशी सैनिकी युती करून चीन भारताला संपवू पाहात आहे आणि दुसरीकडे जागतिक खुल्या आर्थिक धोरणाचा गैरफायदा घेऊन आपल्या स्वस्त व तकलादू वस्तू भारतीय बाजारात विक्री करीत भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करू पाहात आहे. भारतातून कमावलेल्या पैशांवर भारतासोबतच युद्धाची भाषा करण्याचे चीनचे धोरण हाणून पाडण्यासाठी चिनी मालावर बहिष्कार मोहिम सुरू करण्याबाबत जळगावातील विवेकानंद बहुउद्देशिय मंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सुरु केली आहे.
जळगावात व्यापा:यांचा मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प
सोमवारी  विवेकानंद मंडळातर्फे गोलाणी मार्केट मोबाईल व्यापारी असोसिएशनच्या पदाधिका:यांसोबत चर्चा करून चायना कंपनीचे मोबाईल व वस्तूंची विक्री न करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. व्यापा:यांनी देखील चायना कंपनीची मालकी असलेल्या मोबाईल कंपनीचे फलक उतरविले आहेत. तसेच चायना कंपनीचे मोबाईल विक्री न करण्याचा संकल्प केला आहे. चायना वस्तूंवरील बहिष्कारासाठी विवेकानंद बहुउद्देशिय मंडळातर्फे जनजागृतीपर पत्रक वाटप करण्यात येत आहेत. या संदर्भात मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता गोलाणी मार्केटमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे.
चिनी वस्तूंवर बहिष्कार का?
मसूद अजहरला दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात चीनने खोडा घातला. भारताच्या  सीमेतून महामागार्ची निर्मिती सुरू केली. अरुणाचल प्रदेशावर चीनचा दावा कायम आहे. सिमेवर नियमितपणे चिनी सैनिक भारतीय सैनिकांसोबत उर्मट वर्तन करत असतात. दुसरीकडे चिनी वस्तूंचे मार्केट भारतात इतके वाढलेले आहे, की त्याचा फटका अनेक भारतीय उद्योगांना बसलेला आहे.