शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वीज खंडित मोहीम बंद करा; आधी बिले दुरुस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 08:35 IST

वीज कनेक्शन नाही वा पुरवठा होत नाही तरीही बिलिंग सुरू आहे. वीजबिले व थकबाकी जादा, दीडपट, दुप्पट वा अधिक आहे. अशा शेतीपंप ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची महावितरणची सुरू असलेली मोहीम त्वरित बंद करावी. पिकांचे होत असलेले नुकसान व वाढत चाललेला असंतोष व उद्रेक त्वरित थांबवावा.  बहुतांशी शेतीपंपधारकांची वीजबिले व थकबाकी दुप्पट फुगविलेली, पोकळ व बोगस असल्याने प्रथम वीजबिले दुरुस्त करावीत. त्यानंतरच सवलत योजनेच्या अंतर्गत लाभ देऊन वसुली करावी, अशा मागण्या महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सरकारकडे केल्या आहेत.

वीज कनेक्शन नाही वा पुरवठा होत नाही तरीही बिलिंग सुरू आहे. वीजबिले व थकबाकी जादा, दीडपट, दुप्पट वा अधिक आहे. अशा शेतीपंप ग्राहकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. महावितरणने ५० टक्के ग्राहक सवलत योजनेत सहभागी झाले आहेत, अशी प्रसिद्धी सुरू केली. पण महावितरणच्या वेबसाइटवरील माहितीनुसार जमा रक्कम फक्त १० टक्क्यांच्या आत आहे. बिले दुरुस्त केली, तरच शेतीपंप वीजबिल सवलत योजना यशस्वी होऊ शकते. तक्रार करेल त्या प्रत्येकाचे सप्टेंबर २०१५ पासून आजअखेरचे बिल दुरुस्त करावे. दुरुस्त बिलानुसार सवलत द्यावी, अशी कंपनीची १५ जानेवारी २०२१ व १५ फेब्रुवारी २०२१ ची स्पष्ट परिपत्रके आहेत. त्याप्रमाणे उपविभागीय पातळीवर १ लाखपर्यंत व विभागीय पातळीवर ५ लाखांपर्यंत बिल दुरुस्ती करण्याचे अधिकारही देण्यात आले आहेत; पण व्यवहारामध्ये याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. अनेक हेलपाटे मारूनही व ६/६ महिने वाट पाहूनही बिले दुरुस्त केली जात नाहीत. अल्प वसुलीचे हे खरे, एकमेव व मूळ कारण आहे, हे लक्षात घेऊन योजना आखणे गरजेचे आहे, असेही होगाडे यांनी सांगितले.

बिले दुरुस्ती केल्यामुळे ३० सप्टेंबर २०२० अखेरच्या वसुलीस पात्र रक्कम ३० हजार कोटीवरून खाली येईल. शेतीपंप ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण झाला तर वसुलीचे प्रमाण निश्चित वाढेल. वसुलीस पात्र रक्कम २० हजार कोटींवर आली तरीही १० हजार कोटी प्रत्यक्ष जमा होऊ शकतील.

टॅग्स :mahavitaranमहावितरण