शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

चारा छावण्या का बंद? हायकोर्टाची विचारणा

By admin | Updated: February 17, 2016 03:22 IST

अवघ्या दोन महिन्यांत राज्यातील सुमारे १४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना अशा दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय कसा घेतला? अशी विचारणा

मुंबई : अवघ्या दोन महिन्यांत राज्यातील सुमारे १४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना अशा दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय कसा घेतला? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. तसेच, शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली विशेष कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे मतही उच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले.राज्य सरकारने लातूर, बीड, उस्मानाबाद या दुष्काळी जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली असतानाच मंगळवारी आत्महत्यांच्यासंदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय का घेतला? अशी विचारणा सरकारकडे केली. त्यावर मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सरकारकडून याविषयी माहिती घेऊ, असे आश्वासन खंडपीठाला दिले. (प्रतिनिधी)शेतकरी आत्महत्यांची कारणे‘नापीक जमीन, राष्ट्रीयीकृत, सहकारी किंंवा अधिकृत सावकारांकडून घेतलेले कर्ज आणि कर्ज परतफेडीसाठी असलेला तगादा या तीन कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे महाधिवक्ता अणे यांनी सांगितले. या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. मात्र मुंबईच्या एसी कार्यालयात बसून तिथली परिस्थिती या अधिकाऱ्यांना कशी समजणार?’ अशा शब्दांत अ‍ॅड. अणे यांनी सरकारी अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.सरकारने एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबीयांना तातडीने ३० हजार रुपये आर्थिक मदत करायला हवी; मग उर्वरित रक्कम चौकशीनंतर द्यावी, असेही खंडपीठाने सूचित केले. पाण्याअभावी जिल्ह्यातील रुग्णालये शस्त्रक्रिया पुढे ढकलत आहेत, असे आम्ही वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांतून वाचत आहोत, असे खंडपीठाने म्हटले. त्यास दुजोरा देत अ‍ॅड. अणे यांनी काही जिल्ह्यांत ही स्थिती असल्याचे म्हटले. खंडपीठाने शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष विभाग आहे का? अशी विचारणा करत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी व पुनर्वसन करण्यासाठी विशेष विभाग नेमण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.