शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार थांबवा, मगच सातवा वेतन आयोग द्या

By admin | Updated: December 25, 2015 04:30 IST

शासकीय पातळीवर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या भ्रष्टाचारावर तीव्र चिंता व्यक्त करीत, आधी भ्रष्टाचार थांबवण्याची हमी घेऊन, मगच शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे योग्य ठरेल

राकेश घानोडे, नागपूरशासकीय पातळीवर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या भ्रष्टाचारावर तीव्र चिंता व्यक्त करीत, आधी भ्रष्टाचार थांबवण्याची हमी घेऊन, मगच शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे योग्य ठरेल, अशी परखड भूमिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनी भ्रष्टाचारासंदर्भातील एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केली आहे.केंद्र तसेच राज्य शासन व संबंधित संस्थांनी सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात आमूलाग्र वृद्धी झाली. यामुळे शासकीय कर्मचारी भ्रष्टाचार थांबवून प्रामाणिकपणे कार्य करतील, असे सर्वांना वाटत होते. सहाव्या वेतन आयोगाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत व आता शासन सातवा वेतन आयोग लागू करणार आहे. असे असले तरी देशातील चित्र निराशादायक राहिले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आता धनादेशाद्वारेही लाच स्वीकारणे सुरू केले आहे ही बाब अचंभित करणारी आहे, असे न्यायालयाने नमूद केले.येत्या १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील दरी आणखी विस्तीर्ण होईल. खासगी क्षेत्रातील कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त व चांगले कार्य करतात; परंतु त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतन मिळते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.भ्रष्टाचार हा ‘हायड्रा-हेडेड मॉन्स्टर’न्यायमूर्ती चौधरी यांनी भ्रष्टाचाराला ‘हायड्रा-हेडेड मॉन्स्टर’ची उपमा दिली आहे. हा ग्रीक पुराणातील राक्षस होय. तो एक शीर कापल्या गेल्यानंतर त्याऐवजी दोन शीर निर्माण करतो. गेल्या दशकभरातील अनुभव पाहता देशातील भ्रष्टाचार ‘हायड्रा-हेडेड माँस्टर’च्या शीराप्रमाणे वाढत चालला असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे.भ्रष्टाचारी अभियंत्याचा जामीन फेटाळलान्यायालयाने गडचिरोली जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारी कनिष्ठ अभियंता सागर शरद मानकरचा जामीन फेटाळताना ही भूमिका स्पष्ट केली. मानकर व इतर अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत कट रचून शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील पाणी पुरवठा योजनेच्या कामात ३५ लाख ६६ हजार ३१२ रुपयांची अफरातफर केली आहे.