शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा धंद्यांसह भ्रष्टाचार थांबवाच

By admin | Updated: April 5, 2016 01:06 IST

पोलिसांमधील भ्रष्टाचार आणि बेकायदा धंदे पूर्णपणे बंद म्हणजे बंद. याबाबतीतला हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला

पुणे : पोलिसांमधील भ्रष्टाचार आणि बेकायदा धंदे पूर्णपणे बंद म्हणजे बंद. याबाबतीतला हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सोमवारी पहिल्याच बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना भरला. ज्या पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार आणि हद्दीमध्ये बेकायदा धंदे आढळून येतील त्याला सर्वस्वी प्रभारी निरीक्षक जबाबदार असतील असेही त्यांनी ठणकावून सांगितले. पोलीस आयुक्तालयामध्ये सोमवारी शहरातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक उपस्थित होते. पोलीस आयुक्तांनी शहरातील संघटित गुन्हेगारीचा आढावा घेतला. शहरातील गुन्हेगारीची, वाहतूक शाखा, विशेष शाखेच्या उपायुक्तांकडून त्यांच्या शाखेमार्फत चालणाऱ्या कामाची माहिती करून घेतली. दरम्यान, त्यांनी सर्वांना सूचनाही केल्या. यासोबतच गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे यांनी गुन्हे शाखेची माहिती दिली. सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. ‘बॉडी आॅफेन्सेस’ कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. पुणे शहराचे ‘पोलिसिंग’ सुधारण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास सांगतानाच पोलीस ठाण्यात आणि चौक्यांमध्ये आलेल्या नागरिकांना सौजन्याची वागणूक द्या असेही त्यांनी बजावले. तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारी तात्काळ दाखल करून घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. पोलीस ठाणे त्यांना आपलेसे वाटेल अशी वर्तणूक ठेवा असेही त्यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी सकाळी आणि संध्याकाळच्या घाईगडबडीच्या वेळेत ‘पावत्या’ फाडण्यात वेळ घालवू नये. सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांना कामावर जाण्याची तसेच घराकडे परतण्याची घाई असते. अशा वेळेस रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक असते. चौकातील पोलीस पावत्या फाडण्यात दंग असल्यामुळे कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दंड वसुलीपेक्षा वाहतूक नियमनावर अधिक भर द्यावा अशा सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केल्या.