शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नंदुरबारमध्ये दगडफेक, जाळपोळ

By admin | Updated: June 11, 2017 00:57 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या मारहाणीतील जखमीचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्याचे पडसाद नंदुरबारात सकाळी उमटले. शास्त्रीमार्केट परिसरात दगडफेक सुरू झाली.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गेल्या आठवड्यात झालेल्या मारहाणीतील जखमीचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्याचे पडसाद नंदुरबारात सकाळी उमटले. शास्त्रीमार्केट परिसरात दगडफेक सुरू झाली. त्याचे लोण शहरातील इतरही भागात पसरले आणि अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. घरे व वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत सहा पोलीस कर्मचारी व अधिकारी देखील जखमी झाले. दंगेखोरांना आवरण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नऊ नळकांड्या फोडल्या.गेल्या आठवड्यात शास्त्री मार्केट परिसरातील खाद्यपदार्थाच्या लॉरीवर किरकोळ वादातून मारहाण झाली होती. त्यातील एका जखमीचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे सकाळी आठपासूनच तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मंगळबाजार, शास्त्रीमार्केट, स्टेशनरोड, गणपतीमंदीर, सोनारखुंट परिसरातील दुकाने सकाळी उघडलीच नाही. मृताच्या घराच्या परिसरात नातेवाईक जमले होते तर इतर भागात धुसफूस वाढतच होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठिकठिकाणी वाढीव बंदोबस्त तैनात केला होता. सोनारखुंट परिसरात एका गटातील जमावाने अनेक घरी लुटली. दुकानातील वस्तू घेवून जमाव लुटमार करीत होता. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त कमी असल्यामुळे जमावावर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलीस मुख्यालय, तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यामधून अधिकचा पोलीस बंदोबस्त आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.