कामरगाव / धनज बु. (जि. वाशिम) : घरगुती वादातून पत्नीने दगडाने ठेचून पतीचा खून केल्याची घटना ३0 डिसेंबरच्या रात्री ९.३0 च्या सुमारास कामठा (बेलखेड) येथे घडली. कामठा (बेलखेड) येथील अजीजखाँ इब्राहीमखाँ पठाण (६0) व फातमाबी अजीजखाँ पठाण (५0) या दाम्पत्यात घरगुती वाद होता. मंगळवारी रात्री घराचा दरवाजा आतून बंद असताना फातमाबी यांनी पती अजीजखाँ यांच्या डोक्यावर दगडाने जबर मारहाण केली. त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या अजीजखाँ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फातमाबी अजीजखाँ पठाण हिला अटक केली.
दगडाने ठेचून पतीचा खून
By admin | Updated: January 1, 2015 00:55 IST