शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

पश्चिम रेल्वेकडून एसी डबल डेकरला अद्याप नो एन्ट्री

By admin | Updated: May 4, 2015 02:02 IST

कोकणवासियांसाठी असलेल्या एसी डबल डेकर ट्रेनला पश्चिम रेल्वेकडून अजूनही ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी लोअर परेल वर्कशॉपमध्ये

मुंबई : कोकणवासियांसाठी असलेल्या एसी डबल डेकर ट्रेनला पश्चिम रेल्वेकडून अजूनही ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी लोअर परेल वर्कशॉपमध्ये जाणारी ट्रेन अजूनही वसई यार्डातच उभी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत लवकरच येईल, अशी आशा बारगळली आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेकडून एसी डबल डेकर ट्रेन मागील वर्षीच्या गणेशोत्सवात चालविण्यात आली. मात्र प्रिमियम म्हणून ट्रेन धावल्याने या ट्रेनचे भाडे मागणीनुसार वाढत गेले आणि अव्वाच्यासवा भाड्यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर ही ट्रेन दिवाळीत नॉन प्रिमियम म्हणून धावली. परंतु दिवाळीत कोकणात जाण्यासाठी गर्दीच नसल्याने अत्यंत अल्प प्रतिसाद या ट्रेनला मिळाला. त्यानंतर ही ट्रेन देखभाल-दुरुस्तीसाठी सायडिंगलाच ठेवण्यात आली. ही डबल डेकर ट्रेन असल्याने देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेकडे जागाच नसल्याने तीला पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल येथील वर्कशॉपमध्ये पाठविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार ही ट्रेन कांदिवली येथे सायडिंगला ठेवण्यात आली. अजूनही एसी डबल डेकर वसई येथेच उभी आहे. लोअर परेल वर्कशॉपमध्ये जागा उपलब्ध नाही. सध्या गर्दीचा सिझन असल्याने पश्चिम रेल्वेच्या गाड्या देखभाल-दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये आहेत. त्यामुळेच ही समस्या सतावत असण्याची शक्यता आहे असे नरेन्द्र पाटील (मध्य रेल्वे-मुख्य जनसंपर्क अधिकारी) यांनी सांगितले.