शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मराठीसाठी पश्चिम रेल्वेचे पाऊल

By admin | Updated: April 23, 2017 14:56 IST

मुंबई व पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या मराठी नावांची माहिती पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयां कडुन मागीतली आहे

ऑनलाइन लोकमतमीरारोड, दि. 23 - मुंबई व पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या मराठी नावांची माहिती पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयां कडुन मागीतली आहे. काही रेल्वे स्थानकांचा अमराठी भाषेतुन अपभ्रंष व चुकीचा उल्लेख होत असल्याच्या तक्रारी व आंदोलने होत असल्याने रेल्वे प्रशासनाने देखील सकारात्माक पाऊल उचलले आहे. भार्इंदर स्थानकाचा हिंदी व इंग्रजीतुन भायंदर असा सर्रास अपभ्रंश केला जात आहे. शिवाय मराठीतुन सुध्दा भायंदर असे लिहले जात होते. मध्यंतरी तर गुजराती भाषेतली भार्इंदर अशी पाटी लावण्यात आली. महसुली नोंदी भार्इंदर असे नांव असताना त्याचा हिंदी वा इंग्रजीतुनपण भार्इंदर असाच उल्लेख व्हायला पाहिजे अशी गेल्या अनेक वर्षां पासुन शिवसेना, मनसे आदिंची मागणी होत होती. महासभेत सुध्दा ठराव करण्यात आला. परंतु या राजकिय पक्षांनी नंतर याचा पाठपुरावा केला नाही. दरम्यान मराठी एकीकरण समितीने भार्इंदर सह वांद्रे, परळ अशी मराठमोळी गावांची नांवे असताना त्याचा हिंदी, इंग्रजी तुन चालणारा अपभ्रंश रोखण्यची मागणी मुख्यमंत्र्यांसह रेल्वे प्रशासना कडे चालवली होती. त्याच सोबत आरक्षण अर्ज, इत्तर अर्ज मराठी भाषेत उपलब्ध करावेत, तिकीटे व पास मराठी भाषेतुन द्यावेत, सर्व उद्घोषणा, सर्व माहिती फलक व जनजागृती फलक/पत्रकां मध्ये राज्याची राजभाषा म्हणुन मराठीला प्राधान्य देण्याची मागणी चालवली आहे. रेल्वे वर्कस् मॅन्युअल मध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा आग्रह समितीने धरला आहे. त्यासाठी समितीने उपोषण, धरणे आंदोलन, स्वाक्षरी मोहिम तसेच निषेध आंदोलने चालवली . अखेर पश्चिम रेल्वेने सुध्दा सदर बाब गांभीर्याने घेत रेल्वे स्थानकांच्या नावां मध्ये असणारा मराठीचा अपभ्रंश थांबवण्यासाठी सकारात्मक पाऊाल उचलले आहे. पश्चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक आरती सिंह परिहार यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी तर मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना ६ एप्रिल रोजी पत्र पाठवुन त्यांच्या हद्दीत येणारया रेल्वे स्थानकांची मूळ महसुली नोंदी असलेली मराठीतली नांवे व त्याचे शब्दलेखन मागवले आहे. रेल्वे स्थानकांच्या नावांचा चुकीचा उल्लेख होत असल्या बद्दल प्रवाशी व ंसंस्थां कडुन सातत्याने तक्रारी येत आहेत. रेल्वे स्थानकांच्या नावांची मंजुरी राज्य शासना कडुन होत असते. त्यामुळे महसुली नोंदी अलेली नांवे व शब्दलेखन अधिकृत रीत्या उपलबध्द करुन द्यावे जेणे करुन नावात सुधारणा करायची गरज असल्यास ती करता येणार आहे असे रेल्वेने म्हटले आहे. पश्चिम रेल्वेने मराठी नावांचा होणारा अपभ्रंश वा चुकीचा नामोल्लेख बदलण्याच्या हालचाली सुरु केल्याने मराठी एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे. मराठी ही राजभाषा अल्याने तीचा सन्मान व संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असुन मराठीसाठी लढा सुरुच राहिल असे ते म्हणाले.