शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र आईने मुलीला साडेसहा लाखांना विकले

By admin | Updated: July 25, 2016 04:59 IST

राजस्थान येथे राहणाऱ्या सावत्र आईने साडेसहा लाख रुपयांसाठी १४ वर्षांच्या सावत्र मुलीचा विवाह ३५ वर्षांच्या इसमाशी लावल्याची घटना नालासोपारा शहरात घडली

वसई : राजस्थान येथे राहणाऱ्या सावत्र आईने साडेसहा लाख रुपयांसाठी १४ वर्षांच्या सावत्र मुलीचा विवाह ३५ वर्षांच्या इसमाशी लावल्याची घटना नालासोपारा शहरात घडली. तिने याच मुलीला दोन वेळा विकले होते. तर तिच्या कथित नवऱ्याने तिला १५ लाखांना पुण्यात विकण्याची तयारी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे. मुख्य आरोपी असलेली आई आणि मुलीचे वय २० वर्षे असल्याचे प्रतिज्ञापत्र तयार करून देणाऱ्या वकिलाला पकडण्यासाठी तुळींज पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील राणी क्षेत्रात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा कथित विवाह तिची सावत्र आई शांती देवीने देसुरीपाल गावात राहणाऱ्या लक्षाराम चौधरी (३५) याच्याशी ९ आॅगस्ट २०१५ रोजी लावला होता. त्यासाठी तिने त्याच्याकडून साडे सहा लाख रुपये घेतले होते. त्या वेळी तिचे वय १४ वर्षे असताना शांती देवीने खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून ते २० वर्षे दाखवले होते. लक्षाराम चौधरी या मुलीला नालासोपाऱ्यातील संतोषभुवन, वलईपाडा येथील आपल्या घरी घेऊन आला होता. त्यानंतर त्याने तिला कोंडून तिच्यावर अमानुष अत्याचार केले तसेच मारहाणही केली. शुक्रवारी सायंकाळी तिने सुटका करून घेत तुळींज पोलीस ठाणे गाठले. तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी लक्षाराम चौधरीला अटक केली आहे. तर सावत्र आई शांतादेवी आणि नोटरी करणाऱ्या वकिलासह अन्य काही जणांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले आहे. (प्रतिनिधी)