शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कार्यक्रमावर सेनेची छाप

By admin | Updated: January 24, 2016 00:48 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंत्तीनिमित्त परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने योजनांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात पार पडला. मात्र, सरकारी असलेल्या या कार्यक्रमावर पूर्णपणे शिवसेनेची ‘छाप’ दिसून आली. सरकारी असलेल्या आणि घोषित केलेल्या योजनांना ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ नाव देण्यात आले. घोषणा सरकारी जरी असल्या, तरी कार्यक्रम हा शिवसेनेचाच असल्यासारखा वाटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकूणच या सरकारी कार्यक्रमाला ‘इव्हेंट’चे स्वरूप आले होते. परिवहन विभाग आणि एसटीच्या संयुक्त विद्यामाने घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिवहन विभाग व एसटीकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबई सेंट्रल आगारात होणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनाही विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कार्यक्रमाला स्थानिक शिवसेना कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात दिसून आले. आगारात शिवसेनाप्रमुखांचे मोठमोठे होर्डिंग्ज, तर आगाराबाहेर शिवसेना नेत्यांचे बॅनर्स आणि झेंडे लावण्यात आले होते. (प्रतिनिधी) प्रवाशांचे हालमुंबई सेंट्रल आगारात कार्यक्रम होणार असल्याने, या आगारातील सर्व बससेवा परेल आणि दादर टीटी येथून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत बससेवा बंद राहणार होत्या, परंतु याची माहिती नसलेले काही प्रवासी आगारात येत होते. मात्र, सेवा आज बंद असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगताच, प्रवासी आपले सामान आणि मुलाबाळांसह पुन्हा दादर आणि परेलच्या दिशेने जात होते. एसटी आणि परिवहनच्या योजना - अपघातात मृत पावलेल्या प्रवाशाच्या नातेवाईकाला दहा लाख रुपये मिळणारी अपघात सहाय्यता विमा योजना.- भाडेतत्त्वावरील ५00 एसी शिवशाही बसेस- एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मोटार वाहन अभियांत्रिकी महाविद्यालय- एसटी कर्मचाऱ्यांसाठी कन्यादान योजना- दुष्काळग्रस्त भागातील दहा हजार तरुणांना रिक्षा परमिट आणि कर्जपुरवठा.- एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी सुपरस्पेशलिटी रुग्णालय- महिलांना रिक्षा परमिटमध्ये पाच टक्के आरक्षण, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांसाठी रिक्षा परमिटप्रत्यक्षात ‘शिवशाही’ अवतरलीच नाही?एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर ५00 एसी बसेस दाखल होणार आहेत. या बसेसनाच ‘शिवशाही’ बस नाव देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार मुंबई सेंट्रल येथील कार्यक्रमात या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवशाही बस सगळ्यांसमोर सादर करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र, ही शिवशाही बस नव्हतीच, असे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. ५00 एसी बसची निविदा प्रक्रिया अजूनही सुरू आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या जयंत्तीनिमित्ताने शिवशाही बससेवेची घोषणा करण्याचे आधीच नियोजन करण्यात आल्याने एसटीची चांगलीच पंचाईत झाली.त्यामुळे महामंडळाने स्कॅनिया कंपनीच्या एका एसी बसला रंगरंगोटी करून ही बस सादर केल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही बस सादर करताना परिवहनच्या नियमांनाही तिलांजली देण्यात आली. न्यायालयाच्या निर्देशानुसार बसच्या काचा पारदर्शक असायला हव्यात, परंतु ही बस पूर्णपणे भगव्या रंगाने आणि झेंड्यांनी रंगविण्यात आली होती. ही बस सांभाळण्यासाठी स्कॅनिया कंपनीचे कर्मचारीही उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या हातातही भगवे झेंडे देण्यात आल्याने हा सरकारी कार्यक्रम आहे की, शिवसेनेचा हेच अनेकांना समजत नव्हते. त्यातच एसटीकडून ‘शिवशाही’बस सादर करताना, त्यावर भगवा रंग आणि झेंडा दाखवण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.या कार्यक्रमाला पूर्णपणे इव्हेंटचे स्वरूप देण्यात आले होते. इव्हेंट पाहणाऱ्या एका खासगी कंपनीला हे काम देताना चांगलीच रक्कम मोजण्यात आल्याची चर्चाही एसटीत रंगली.