शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तहसीलदारांच्या घरात चोरी

By admin | Updated: June 16, 2014 23:25 IST

चोरटयांनी लाडू,शंकरपाळेही खाल्ले : ४५ हजार रुपयांचा माल लंपास

रिसोड : येथील तहसीलदार अमोल कुंभार यांच्या राहत्या घरी ६ ते १५ च्या मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी घ्चोरी करुन घरातील रोख रक्कमेसह ४५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याविषयी प्राप्त माहितीनूसार येथील तहसीलदार अमोल कुंभार हे हिंगोली रोडलगत गंगा मॉ विद्या मंदिराजवळ सतीश गुजरे यांच्या निवासस्थानी भाडयाने राहतात. तहसीलदारासाठी असलेल्या शासकीय निवासस्थानात मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यानेच तहसीलदार कुंभार हे भाडयाच्या घरात वास्तव्यास आहेत.मागील दहा दिवसांपासून तहसीलदार कुंभार त्यांच्या परिवारासह बाहेरगावी गेले होते. नेमका याच संधीचा फायदा घेत रविवारी मध्यरात्री चोरटयांनी घराच्या समोरील दवाजाचे कुलुप,कोंडा लोखंडी रॉडने तोडून घरात प्रवेश केला. बराच वेळपर्यंत चोरटयांनी घरातील प्रत्येक खोलीतील सामानात मौल्यवान वस्तुंचा शोध घेतल्याचे यावेळी त्यांनी मोठया प्रमाणात घरातील साहित्याच्या केलेल्या नासधुस व फेकफाकीवरुन दिसून येत होते. बराच वेळ पर्यंत घरात वावरताना त्यांनी साहेबांच्या घरातील लाडू व शंकरपाळे या गोड खाद्यपदार्थांवर चांगलाच ताव मारला.यावेळी चोरटयांनी चोरुन नेलेल्या साहित्यामध्ये सॅमसंग कंपनीचा एलईडी, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, लहान मुलांचे सोन्या चांदीचे दागिने, इतर वस्तुसह रोख दहा हजार रुपये असा एकूण ४५ हजार रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. दरम्यान सोमवारला सकाळी तहसीलदार अमोल कुंभार हे बाहेरगाववरुन घरी परत आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. झालेल्या चोरीची माहीती तहसीलदार कुंभार यांनी ठाणेदार राऊत यांना तात्काळ दिली. रिसोड पोलिसांनी चोरीचा पंचनामा करुन अज्ञात चोरटयांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा छडा तातडीने लावण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी वाशिम येथून ठसेतज्ज्ञ, श्‍वानपथकालाही पाचारण केले होते. चोरीचा तपास ठाणेदार सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो. निरिक्षक संजय गवई, पो.उप.निरिक्षक रवि हुंबेकर, पो.हे.कॉ.शांताराम राठोड, पो.कॉ.सचिन शिंदे करीत आहेत.