शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

राज्यात वैधानिक मंडळे केवळ अनुशेषासाठी तयार केलेली नाहीत !

By admin | Updated: July 28, 2015 03:19 IST

घटनेच्या अनुच्छेद ३७१ (२) अन्वये राज्यात स्थापन करण्यात आलेली प्रादेशिक विकास मंडळे केवळ अनुशेष दूर करण्यासाठी नाहीत, तर राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण

मुंबई : घटनेच्या अनुच्छेद ३७१ (२) अन्वये राज्यात स्थापन करण्यात आलेली प्रादेशिक विकास मंडळे केवळ अनुशेष दूर करण्यासाठी नाहीत, तर राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत, असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वैधानिक विकास मंडळावरून पुन्हा नव्याने चर्चा सुरू होऊ शकते. राज्यातील तिन्ही विकास मंडळांच्या अध्यक्ष व तज्ज्ञ सदस्यांची राज्यपालांनी राजभवन येथे एक बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांनी आपापल्या भागातील महत्त्वाच्या प्रश्नांवर विषयवार अभ्यासगट स्थापन करून सर्वंकष योजना कराव्यात, तसेच अशा अभ्यासगटांत विद्यापीठातील तज्ज्ञांचा समावेश करावा, अशी सूचना करीत राज्यपालांनी या मंडळांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. परिणामी या मंडळावरून निधीची पळवापळवी आणि ठरावीक भागांचाच विकास हे मुद्दे आता कळीचे बनणार आहेत. राज्यपालांच्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्यास विदर्भ व मराठवाड्याचा अनुशेष दूर होण्यास मदत होईल, असे सांगतानाच राज्य शासनाच्या अखत्यारीतील सेवा तसेच तंत्रशिक्षण व व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी यामध्ये या दोन विभागांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन विदर्भ विकास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मधुकरराव किंमतकर यांनी केले.मेळघाट परिसरात लसीकरण प्रभावीपणे न होण्यास विजेची अनियमितता हे कारण असल्याचे विदर्भातील सदस्य डॉ. रवींद्र कोल्हे यांनी निदर्शनास आणले. विजेच्या अनियमिततेमुळे लशींची साठवणूक करता येत नाही व परिणामी मुलांना वेळेवर रोगप्रतिबंधक लस देता येत नाही, असे त्यांनी सांगितले.मराठवाडा विकास मंडळातर्फे १० वेगवेगळ्या विषयवार समित्या स्थापना करण्यात येतील, असे मंडळाचे कार्यवाह अध्यक्ष व विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले. उर्वरित महाराष्ट्रात फलोत्पादन व व्यावसायिक निर्यातक्षम शेतीची क्षमता मोठी असून त्याला अधिक चालना दिली पाहिजे, असे प्रतिपादन उर्वरित महाराष्ट्राचे तज्ज्ञ सदस्य उमेशचंद्र सरंगी यांनी केले. $$्निरोजगार क्षमता वाढविणारराज्यातील आदिवासी लोकसंख्येपैकी निम्मे लोक उर्वरित महाराष्ट्राच्या १७ जिल्ह्यांमध्ये राहत असल्याचे सांगून उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचा भर आदिवासी विकास तसेच आदिवासींची रोजगार क्षमता वाढविणे यावर असेल, असे राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले.