शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

देशात आर्थिक अराजकतेची स्थिती - चव्हाण

By admin | Updated: November 18, 2016 05:29 IST

धनदांडग्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देण्यासाठी मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा बळी देत आहे.

नांदेड : धनदांडग्या उद्योगपतींना हजारो कोटींची कर्जमाफी देण्यासाठी मोदी सरकार सर्वसामान्य नागरिकांचा बळी देत आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा मोदी सरकारचा निर्णय लोकांच्या जिवावर बेतला असून, आजपर्यंत नांदेडसह राज्य व देशभरात ३३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोदी सरकार आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.केंद्र सरकारने कुठलीही पूर्वतयारी आणि पुरेशी पर्यायी व्यवस्था न करता नोटा चलनातून बाद केल्याने देशात आर्थिक अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. एटीएम आणि बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा आहेत. चार-चार दिवस रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नसल्याने नागरिकांवर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.रुग्णालय जुन्या नोटा स्वीकारत नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यू होत आहेत, शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. लग्नकार्ये खोळंबली आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे. बँकेतून पैसे मिळत नसल्याने बाजार समित्यामधील व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात आहे. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असतानाही सरकार मात्र लोकांना त्रास होऊ नये म्हणून कुठलीही तातडीची उपाययोजना केली जात नाही. नोटा बदलून घेण्याच्या गोंधळात झालेल्या सर्व मृत्यूला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असेही ते म्हणाले. कर्जबुडव्या धनदांडग्या उद्योगपतींना कर्जमाफी देता मग शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही, असा सवाल खा. चव्हाण यांनी केला आहे. (प्रतिनिधी)