शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेखाली सापडून स्टेशन मास्टरचा मृत्यू

By admin | Updated: May 9, 2014 01:59 IST

घाईघाईने ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आशीषकुमार चौधरी (३४) रा. बाणगाव या सहायक स्टेशन मास्तरचा बुधवारी रात्री ट्रेनखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

बोईसर/पालघर : आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने पत्नी व दोन लहान मुलांसह बोईसर येथे खरेदी केल्यानंतर मुलांना भूक लागल्याने त्यांच्यासाठी खाऊ घेऊन घाईघाईने ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आशीषकुमार चौधरी (३४) रा. बाणगाव या सहायक स्टेशन मास्तरचा बुधवारी रात्री ट्रेनखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बिहारमधील सीतामढी येथील आशीषकुमार चौधरी हे चार वर्षांपासून वाणगाव रेल्वे स्टेशनवर सहायक स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत होते. पत्नी सुगंधा, ४ व ६ महिन्यांच्या दोन मुलांसह ते वाणगावच्या रेल्वे क्वॉर्टर्समध्ये राहत होते. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुपारी ड्युटी संपवून ते आपल्या पत्नी व दोन मुलांसह खरेदी करण्यासाठी बोईसर येथे गेले होते. सर्व खरेदी केल्यानंतर घरी जाण्यासाठी ते वाणगावच्या दिशेने जाणार्‍या ५९०२३ डाऊन बलसाड एक्स्पे्रस गाडीची वाट पाहत रात्री ८.३० वाजताच्या सुमारास बोईसर स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे होते. गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसह मुलांना फर्स्ट क्लासच्या डब्यात बसवले. याच वेळी मुलाने भूक लागल्याने आपल्याला खाऊ हवा, अशी मागणी चौधरी यांच्याकडे केली. खाऊ घेऊन परत येत असताना बलसाड ट्रेन सुरू झाली. ती धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात ते प्लॅटफॉर्मच्या खाली गॅपमध्ये पडले व त्यांच्या अंगावरून गाडी जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. आणखी एकाचा मृत्यू गुरुवारी रात्री १२.१५ वा़ पालघर-बोईसरदरम्यान एका ट्रेनमधून सुदर्शन लक्ष्मण तांडेल, रा. न्यू पनवेल (३४) हा खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची नोंद पालघर रेल्वे पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पो.नि. रवींद्र नाईक करीत आहेत. (वार्ताहर)

थेट मृतदेहच समोर आला

ट्रेन पुढे निघून गेल्यानंतर बोईसर स्टेशनवरून काही वेळानंतर आशीष चौधरी यांच्या पत्नीशी मोबाइलवरून संपर्क साधून तुमच्या पतीची तब्येत बरी नसल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आल्याचे कळवण्यात आले. आपल्या पतीची वाट पाहणार्‍या दुर्दैवी सुगंधा यांच्यापुढे पतीचा मृतदेहच आला.