शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्टेशन मास्तरला ४ वर्षे सश्रम कारावास

By admin | Updated: May 23, 2016 04:36 IST

सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा

औरंगाबाद : सिकंदराबाद-मनमाड एक्स्प्रेस आणि मालगाडीच्या २००३ साली झालेल्या अपघातास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून घाटनांदूर रेल्वेस्टेशनचे तत्कालीन स्टेशन मास्तर प्रशांतकुमार वर्मा याला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (रेल्वे) ए.सी. डोईफोडे यांनी एकूण चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच तत्कालीन पॉइंटस्मन विनायक नागरगोजे याला दोन वर्षे कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.एक मालगाडी ३ जानेवारी २००३ रोजी मध्यरात्री सिग्नल मिळाल्याने घाटनांदूर रेल्वेस्टेशनच्या ‘मेन लाईन’वर उभी होती. पहाटे १.३० वाजता ‘सिकंदराबाद-मनमाड’ एक्स्प्रेस लातूर रोडहून घाटनांदूर मार्गे परळीकडे रवाना होणार होती. ही रेल्वे घाटनांदूरला आल्यानंतर हिरवे ‘आऊटर’ आणि ‘होम’ सिग्नल देऊन ही रेल्वे ‘मेन लाईन’वर जाण्याचा संकेत देण्यात आला. त्यानुसार ही रेल्वे मेन लाईनवर रवाना झाली. या रेल्वेने होम सिग्नल पार केल्यानंतर मेन लाईनवर मालगाडी उभी असल्याचे रेल्वेचालकाला दिसले. म्हणून रेल्वे थांबविण्यासाठी चालकाने ‘इमर्जन्सी ब्रेक’ (आपत्कालीन) लावले; परंतु दुर्र्दैवाने ही रेल्वे मालगाडीच्या मागील बाजूस धडकली. परिणामी रेल्वेचे इंजिन, ए.सी. कोच, एक जनरल बोगी रुळाखाली घसरली. तसेच ७४ लोक गंभीर जखमी झाले होते आणि २० लोक मरण पावले होते.परळीच्या रेल्वे पोलिसांनी सदर अपघाताचा तपास करून स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मनविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीअंती न्यायालयाने स्टेशन मास्तर आणि पॉइंटस्मन यांना दोषी ठरवले आणि स्टेशन मास्तर वर्मा याला भा.दं.वि. कलम ३०४ (अ) खाली दोन वर्षे सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला. (प्रतिनिधी)