शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन

By admin | Updated: March 30, 2017 22:06 IST

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सत्यजित बर्मन यांनी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

ऑनलाइन लोकमतकल्याण, दि. 30 - माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती पूर्णपणे देण्यास टाळाटाळ केल्याने माहिती अधिकाराचे कार्यकर्ते सत्यजित बर्मन यांनी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अधिकारी जोपर्यंत पूर्णपणे माहिती देत नाही. तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा बर्मन यांनी दिला आहे.अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणा-या पाण्यावर प्रकिया न करताच थेट वालधुनी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाली आहे. महापालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प आणि आनंदनगर औद्योगिक परिसरातील रासायनिक कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद होता. तरी देखील सांडपाणी नदीपात्रात सोडले जात होते. प्रदूषणास जबाबदार असलेल्या कारखानदारांवर काय कारवाई केली. त्याचबरोबर गुजरातच्या पर्यावरण सुरक्षा संस्थेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 2012 रोजी दिलेल्या सुनावणीनुसार सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात यावी, असा देशव्यापी निकाल दिला आहे. त्याची अंमलबजावणी सहा महिन्यांच्या आत केली जावी, असे न्यायालयाने सूचित केले होते. त्यानुसार काय अंमलबजावणी केली. याचाही जाब बर्मन यांनी माहितीच्या अधिकारात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयास विचारला होता.6 मार्चला माहिती अधिकाराचा अर्ज स्वत: भेटून बर्मन यांनी कार्यालयास सादर केला होता. त्यावर 22 मार्च रोजी माहिती दिली जाईल असे सांगण्यात आले. त्यांना अर्धवट माहिती दिली गेली. उर्वरीत माहितीसाठी त्यांना पुन्हा कार्यालयात प्रत्यक्ष येण्यास सांगितले. ते सोमवारी कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना माहितीच्या अधिकारीतील माहितीची फाईल पाहून घ्या. ङोरॉक्स मशीन खराब आहे. प्रदूषणास जबाबदार असलेल्या कोणत्या कारखान्यांना कारखाना बंद करण्याची नोटिस बजावली आहे. त्याची माहिती बर्मन यांना हवी होती. हीच माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने बर्मन यांनी माहिती आत्ताच द्या अन्यथा कार्यालय सोडणार नाही. बर्मन यांनी कार्यालयात ठिय्या दिला आहे. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.