शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून पेट्रोलपंप धारकांचे राज्यव्यापी आंदोलन

By admin | Updated: November 2, 2016 18:45 IST

ट्रोलियम डिलर्सच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे़ या दुर्लक्षपणामुळे पेट्रोल डिलर्सचे नुकसान होत आहे़ या शासनाच्या विरोधात उद्यापासून

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 02 - पेट्रोलियम डिलर्सच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे़ या दुर्लक्षपणामुळे पेट्रोल डिलर्सचे नुकसान होत आहे़ या शासनाच्या विरोधात उद्यापासून (३ व ४ नोव्हेंबर रोजी)पेट्रोल खरेदी न करण्याचा, ५ नोव्हेबर रोजी फक्त एकाच शिफ्टमध्ये विक्री करण्याचा तर ६ नोव्हेंबर पासून रविवार व बँक हॉलीडेजच्यास दिवशी सर्वच व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय ताटे-देशमुख व फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अपूर्वचंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली पेट्रोल डिलर्सच्या अडचणीबाबत कमिटी गठीत करण्यात आली होती़. या समितीचा अहवाल येथुन ३ वर्ष झाला तरी कार्यवाही झाली नाही. सध्या डिझेलला १ रूपया ४८ पैसे तर पेट्रोलला २ रूपये ४५ पैसे इतके कमिशन मिळते.पेट्रोलपंपाचा व्यवस्थापन खर्च, कायदे नियम, सुविधा पाहता हे कमिशन अत्यंत अपुरे असून व्यवसाय चालविणं कठीण झालं आहे,  असेही संजय ताटे-देशमुख यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा पेट्रोलपंप डिलर असोसिएशनं आपल्या अडचणी सरकारच्या तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. मात्र या आंदोलनाकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केले आहे़ पेट्रोल पंपधारकांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. यापुढे कमिशनवाढीचा निर्णय न झाल्यास पेट्रोलपंप चालक आपल्या खर्चात बचत म्हणून रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी पंपावरील व्यवहार बंद ठेवणार आहेत़ २९ आॅक्टोबरला डिलर्सनी पंपावर ब्लॅक आऊटचं आंदोलन केलं मात्र पुढे सामन्य ग्राहकास आंदोलनाचा त्रास होवू नये यासाठी पंपावरील सेवा सुरळीत ठेवल्या.  
या पत्रकार परिषदेस महेंद्र डोंगरे, केदारनाथ बावी, निखिल केंगनाळकर, प्रकाश हत्ती आदी पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.