शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रेडिओलॉजिस्टचा राज्यव्यापी बेमुदत संप

By admin | Updated: June 19, 2016 02:31 IST

राज्यातील मुलींचा घटता जन्मदर वाढावा, म्हणून ‘प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स’ (पीसीपीएनडीटी) कायदा कडकपणे लागू करण्यात आला, पण या कायद्यांतर्गत कारवाई

मुंबई : राज्यातील मुलींचा घटता जन्मदर वाढावा, म्हणून ‘प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स’ (पीसीपीएनडीटी) कायदा कडकपणे लागू करण्यात आला, पण या कायद्यांतर्गत कारवाई करताना सबळ पुरावे हाती नसतानाही, रेडिओलॉजिस्टची सोनोग्राफी मशिन सील केली जात आहेत. निर्दोष रेडिओलॉजिस्टवर केल्या जाणाऱ्या कारवाईविरुद्ध राज्यातील २ हजार रेडिओलॉजिस्ट सोमवार, २० जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.पुण्यातील रेडिओलॉजिस्ट डॉ. आशुतोष जपे यांनी एका गर्भवती महिलेची सोनोग्राफी केली होती. त्या वेळी गर्भात दोष असल्याचे त्यांनी महिलेला सांगितले होते. या महिलेचा एफ फॉर्म आॅनलाइन भरताना त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यामुळे डॉ. जपे यांचे मशिन सील करण्यात आले. प्रत्यक्षात आॅनलाइन फॉर्म अपूर्ण भरला गेल्याच्या स्थितीतही अनेकदा कारवाई होताना दिसते. पुण्यात अशा प्रकारे निर्दोष रेडिओलॉजिस्टवर कारवाई सुरू आहे. अशा प्रकारे कारवाई होत असल्यामुळे रेडिओलॉजिस्ट भीतीच्या छायेखाली आहेत. या संदर्भात राज्य सरकार, आरोग्य खात्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याचे रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश ठक्कर यांनी सांगितले. १४ जूनपासून पुण्यातील रेडिओलॉजिस्ट संपावर आहेत, पण पुणे महानगरपालिकेशी चर्चा करूनही कोणताही तोडगा निघाला नाही, त्यामुळे राज्यव्यापी संप करत आहोत. यात रुग्णांचे हाल होऊ नयेत, म्हणून आपत्कालीन स्थितीत रुग्णांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याचेही डॉ. ठक्कर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)रेडिओलॉजिस्टच्या मागण्या - निर्दोष डॉ. जपे यांच्यावरील आरोप काढून टाका - डॉ. जपे यांच्या मशिनचे सील काढा- पुणे महापालिकेतील दोषींवर कारवाई करा