शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्याची आता विवेकानंद युवामित्र योजना!

By admin | Updated: January 17, 2015 00:09 IST

नेहरु युवा केंद्राच्या धर्तीवर नियोजन; व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल करणार जनजागृती.

अकोला : केंद्र शासनाच्यावतीने नेहरु युवा केंद्र चालविले जाते. त्याच धर्तीवर राज्यात विवेकानंद युवामित्र योजना सुरु करण्यात येत आहे. या योजनेत जिल्हा व तालुकास्तरावर युवामित्रांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांना अनुक्रमे पाच व तीन हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या युवामित्रांना त्यांच्या परिसरात व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल जनजागृती करावी लागणार आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाने नेहरु युवा केंद्राची स्थापना केली. या माध्यमातून युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याबरोबरच समाजात जनजागृती करण्याचे काम केले जाते. हे कार्य लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यात ह्यविवेकानंद युवकमित्रह्ण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या आघाडी शासनाने जे युवा धोरण जाहीर केले होते, त्यात अशा प्रकारचा उपक्रम सुरु करण्याचे सुतोवाच केले होते. युती सरकारने १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती दिनी विवेकानंद युवामित्र उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या अख्यारित हा उपक्रम राबविण्यात येईल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या युवकांना या उपक्रमात प्राधान्य दिले जाईल. युवामित्राला दर महिन्याला मानधन दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने युवकांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे *अशी असेल योजनायुवामित्र योजनेअंर्तगत राज्यातील ३६ जिल्हे, ३५८ तालुके आणि मुंबईतील २४ विभागांमध्ये युवामित्र नियुक्त केले जाणार आहेत. जिल्हास्तरावर काम करणार्‍या युवामित्राला ५ हजार रुपये, तर तालुकास्तरावरील युवामित्राला ३ हजार रुपये प्रति महिना मानधन दिले जाईल. युवामित्रांना व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शासनाच्या विविध योजनांबद्दल समाजात जनजागृती करावयाची आहे.