शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

राज्यातील उद्योग कर्नाटकात जाऊ देणार नाही

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

सुभाष देसाई : सांगलीत शिवसेनेतर्फे नागरी सत्कार

सांगली : महाराष्ट्रात उद्योग-व्यवसायास चांगले वातावरण असून, यापूर्वीच्या मंत्र्यांकडे इच्छाशक्ती नसल्याने काही उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतराचा निर्णय घेतला होता. परंतु आम्ही उद्योग क्षेत्राला महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकावर नेणार असून, भविष्यकाळात राज्यातील एकही उद्योग गैरसोयींअभावी कर्नाटकात जाऊ देणार नसल्याचे मत उद्योगमंत्री व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज, बुधवारी व्यक्त केले.येथील मारुती चौकात जिल्हा शिवसेनेच्यावतीने उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पक्षाचे उपनेते संजय बानुगडे-पाटील यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले होते. सत्कारास उत्तर देताना देसाई बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार संभाजी पवार, पृथ्वीराज पवार, जिल्हाप्रमुख आनंद पवार, विकास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. देसाई म्हणाले की, राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी झाल्याने सरकार स्थिर झाले आहे. यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. कारखान्यांसाठी राज्यातील काहींनी जमिनी घेतल्या आहेत. परंतु त्याचा काहीही वापर केलेला नाही. सरकारतर्फे आम्ही त्या पडून असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांचे फेरवाटप करण्याचे निश्चित केले आहे. सांगलीतील औद्योगिक वसाहतीची पाहणी केली असता, तेथील रस्त्यांची दुरवस्था नजरेत आली. येथील मंत्री इतर कामात मश्गुल असल्यानेच ही वेळ आली आहे. आज रस्त्यांच्या कामांचा प्रारंभ केला आहे. रस्ते दर्जेदारच झाले पाहिजेत, अशा सूचना ठेकेदारांना दिलेल्या आहेत. भविष्यात सर्वच औद्योगिक वसाहतीतील रस्ते उत्तम झालेले दिसतील. शिवसेनेची बांधणी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली असल्याने भविष्यात राज्यातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून शिवसेना उदयास येईल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले की, जनसामान्यांचे प्रश्न मांडणारी सेना सत्तेत आल्याने पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितपणे अधिकाधिक निधी मिळेल. यावेळी पृथ्वीराज पवार यांनी, भविष्यात सांगली हे देशाचे रोल मॉडेल होईल, यासाठी उद्योगमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. शहरप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी स्वागत केले. अजिंक्य पाटील यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)