शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण गुंतवणूकवाढीसाठी राज्याचे स्वतंत्र धोरण

By admin | Updated: March 5, 2017 02:15 IST

संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीस चालना मिळण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याद्वारे ५ बिलियन डॉलर

मुंबई : संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीस चालना मिळण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. त्याद्वारे ५ बिलियन डॉलर (सुमारे ३३ हजार ५०० कोटी रुपये) गुंतवणूक होणार असून, १ लाख रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.हॉटेल ट्रायडेंट येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने ‘डिफेन्स अँड एरोस्पेस मेक विथ महाराष्ट्र’ या विषयावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत परिषद झाली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मेक इंडिया मोहिमेंतर्गत संरक्षण क्षेत्रातील जागतिक कंपन्या भारतात गुंतवणूक करू पाहात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातदेखील संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील जागतिक कंपन्यांनी गुंतवणूक करावी. त्यासाठी शनिवारी झालेल्या परिषदेत राज्याने तयार केलेले स्वतंत्र धोरण जागतिक कंपन्यांसमोर मांडण्यात आले. त्याचे स्वागत करण्यात आले असून, काही सूचना या कंपन्यांमार्फत करण्यात आल्या असून, त्याचा समावेश धोरणात करण्यात येईल.’

राज्य शासन उभारणार एक हजार कोटींचा फंडफडणवीस म्हणाले की, या क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांची गरज लक्षात घेऊन धोरण तयार करण्यात आले आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना साहाय्य म्हणून राज्य शासन एक हजार कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे. त्याशिवाय अन्य सवलतीदेखील देण्यात येतील.संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, संरक्षण विभागाच्या अतिरिक्त सचिव सुरिन रंजन, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, तसेच भारत फोर्जचे बाबा कल्याणी यांच्यासह देशविदेशातील हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्रातील उद्योजक, स्वीडन, फ्रान्स, रशिया, अमेरिका, ब्रिटन आदी विविध देशांचे वाणिज्य दूत उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)मेक विथ महाराष्ट्र - मुख्यमंत्रीमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये संरक्षण उत्पादन निर्मिती क्षेत्रासाठी अतिशय सुयोग्य वातावरण व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. उद्योगांसाठी स्नेहपूर्ण वातावरण, विविध प्रोत्साहनपर योजना, वाद निवारणासाठी आंतरराष्ट्रीय वाद निवारण केंद्राची स्थापना, कुशल मनुष्यबळ, यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठीचे सर्वोत्तम ठिकाण आहे. संरक्षण व हवाई उत्पादन निर्मिती क्षेत्राच्या उद्योगांसाठीही विशेष धोरणांतर्गत सवलती देण्यात येणार आहेत.राज्यात २५ टक्के उत्पादनसंरक्षण क्षेत्रातील २५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. परिषदेमध्ये जागतिक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीस सकारात्मकता दर्शवली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राला प्राधान्य - पर्रीकरमहाराष्ट्रात संरक्षणाशी संबंधित अनेक संस्था, तसेच खासगी उद्योग आहेत.येथे कायदा सुव्यवस्था अतिशय उत्तम आहे. संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्यांना सुरक्षित वातावरण मिळत असल्याने, महाराष्ट्र हे लवकरच संरक्षण व हवाई संरक्षण उत्पादन निर्मितीचे हब बनेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.