शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडाही स्वतंत्र व्हावा, श्रीहरी अणेंचे वक्तव्य

By admin | Updated: March 21, 2016 03:35 IST

मराठवाडा व विदर्भाचे दु:ख सारखेच आहे. उलट मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झाला. त्यामुळे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र व्हावा

जालना : मराठवाडा व विदर्भाचे दु:ख सारखेच आहे. उलट मराठवाड्यावर विदर्भापेक्षा जास्त अन्याय झाला. त्यामुळे विदर्भाबरोबर मराठवाडाही स्वतंत्र व्हावा, असे मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी जालना येथे व्यक्त केले. मराठवाडा राज्य निर्मितीसाठी स्थापन झालेल्या मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना अणे यांच्या हस्ते साडी-चोळीचे वाटप करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. राज्यनिर्मितीचा निर्णय केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविषयी मराठवाड्याच्या जनतेने गैरसमज करून घेऊ नये, असे सांगत येथील जनतेने व्यापक लढा उभारावा, असे आवाहनही अणे यांनी केले. ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच म्हटले होते की, महाराष्ट्राची तीन राज्ये आहेत. त्यांना एकाच नकाशात कोंबले, तर विदर्भ आणि मराठवाड्यावर मोठा अन्याय होईल. आंबेडकरांचे ते भाकित आज खरे ठरत आहे. मी जशी विदर्भाची बाजू मांडली. त्याचप्रमाणे, मराठवाड्याचीही बाजू मांडण्यास तयार आहे. कुठल्याही राजकीय पक्षांना विदर्भ वा मराठवाडा स्वतंत्र व्हावा, असे वाटत नसते. कारण त्यांना फक्त मुंबईवर राज्य करायचे असते,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. (प्रतिनिधी)१०५ हुतात्मांच्या बलिदानानंतर मिळालेल्या महाराष्ट्र राज्याचे तुकडे पाडू इच्छिणारे अणे यांची महाधिवक्ता पदावरून उचलबांगडी करावी.- खा. अरविंद सावंत, शिवसेना