शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

राज्यमंत्र्यांच्या विधानावरून गदारोळ

By admin | Updated: April 8, 2016 02:46 IST

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विरोधी सदस्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यमंत्र्यांच्या विधानामुळे संतप्त

मुंबई : सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विरोधी सदस्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे विधान परिषदेत प्रचंड गदारोळ झाला. राज्यमंत्र्यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी माफीनाम्याची मागणी लावून धरल्याने तब्बल सहा वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर विरोधक शांत झाले.गुरुवारी दुपारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राष्ट्रवादीचे सदस्य अमरसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील खंडूबाबा माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली. यावर बोलताना राज्यमंत्री कांबळे म्हणाले की, मुलींची शाळेतून गळती होऊ नये यासाठी महिना साठप्रमाणे दहा महिन्यांसाठी ६०० रुपयांचे अनुदान दिले जाते. संबंधित शाळेतील काही मुलींनी शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार केली होती. २००९ ते २०१३ या काळातील हा प्रकार आहे. याचा तपास केला असता केवळ ९०० रुपयांचा हा प्रकार असल्याचे आढळून आले. ९०० रुपये संस्थेकडेच पडून होते आणि त्यात कसलीच अफरातफर झाली नसल्याचे स्पष्ट केले. एकीकडे मागासवर्गीय शाळा चालत नसल्याची तक्रार विरोधकांकडून होते, तर दुसरीकडे चांगल्या शाळेला मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु सरकार असे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर विरोधी बाकावर बसलेल्या काही सदस्यांनी आव्हानात्मक टिप्पणी केली. त्यावर राज्यमंत्र्यांनी थेट इशारा देत आक्षेपार्ह विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विरोधी बाकांवरून विशेषत: राष्ट्रवादीच्या सदस्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आली. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कामकाज तहकूब केले.कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आजचा दिवस सभागृहासाठी काळा दिवस असल्याचे म्हटले. सभागृहाची प्रतिष्ठा आणि शिष्टाचार जपणे आवश्यक आहे. राज्यमंत्र्यांचे विधान गंभीर आहे, हे असेच चालू राहिले तर उद्या विरोधी सदस्यांना प्रश्न विचारणेही अशक्य होईल.>सभापती नाईक-निंबाळकर यांनीही राज्यमंत्र्यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. दिलीप कांबळे यांना मी चांगला ओळखतो. ते आज इतके भावनिक का झाले आणि त्यांनी हे विधान कसे केले याबद्दल मलाही आश्चर्य वाटते. त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, असे सभापती म्हणाले.शेवटी सायंकाळी चार वाजता महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. असा प्रकार घडायला नको होता. हे ज्येष्ठांचे सभागृह आहे. दोन्ही बाजूंकडील सदस्यांनी संयम बाळगायला हवा. भावनेच्या भरात, उद्वेगामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. सर्व सदस्यांना आणि सहकारी मंत्र्यांना याबाबत दक्षता घेण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. खडसे यांच्या दिलगिरीनंतर सभागृहाच्या पुढील कामकाजास सुरुवात झाली.