शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वडवलीप्रकरणी २५ जणांच्या जबाबानंतरही गूढ कायम

By admin | Updated: March 4, 2016 03:35 IST

वडवलीतील भीषण हत्याकांड घडवणाऱ्या हसनैन वरेकरने हे कृत्य का केले, याबाबतचा तपास करण्याकरिता पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवले आहेत

जितेंद्र कालेकर, ठाणेवडवलीतील भीषण हत्याकांड घडवणाऱ्या हसनैन वरेकरने हे कृत्य का केले, याबाबतचा तपास करण्याकरिता पोलिसांनी आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, अद्याप पोलिसांना हत्याकांडाचे नेमके कारण शोधून काढण्यात यश आलेले नाही. आता हसनैनचे यापूर्वी काही गुन्हेगारी रेकॉर्ड होते किंवा कसे, याचाही तपास सुरू झाला आहे.हसनैनची बहीण व हत्याकांडाची एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार सुबियाने रविवारी पहाटे ३ वा.च्या सुमारास आरडाओरडा केला तेव्हा तिच्या मदतीसाठी धावून आलेला तिचा चुलत भाऊ अल्तमेश वरेकर याचीही जबानी महत्त्वाची मानली जात आहे. मंगळवार आणि बुधवारी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. सुबियाने धावा केल्यावर तुम्ही किती वाजता वरेकरांच्या घराकडे धाव घेतली? खिडकी तोडण्यासाठी लोखंडी पहारीचा कसा वापर केला, इथपासून हसनैनच्या स्वभावापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे या जबाबात नोंदविण्यात आली. अल्तमेशची आई हसनैनची चाची शाहिस्ता वडेकर तसेच मामा अयाज वडेकर, मुजीब वडेकर आणि काका जईद आदी नातेवाइकांसह २० ते २५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. अर्थात, या सर्व जबाबांमधून विशेष काही पोलिसांच्या हाती लागले नसल्याचेही समजते. गेल्या पाच दिवसांपासून सर्व बाजूंनी तपास सुरू असला तरी स्पष्ट दिशा सापडत नसल्याने हसनैनच्या विरुद्ध कोकण, ठाणे शहर व ग्रामीण, नवी मुंबई आणि मुंबई या पोलीस आयुक्तालयात कुठल्याही स्वरूपाचे गुन्हे यापूर्वी दाखल झाले आहेत किंवा कसे, याचाही आढावा पोलीस घेत आहेत. हसनैनने हे हत्याकांड करण्यामागे अंधश्रद्धा किंवा एखाद्या जहाल गटाची प्रेरणा आहे किंवा कसे, हे तपासण्याकरिता त्याने कोणकोणत्या दर्ग्यांना भेटी दिल्या, याची खातरजमा करण्याकरिता त्याच्या मोबाइलचे गेल्या महिनाभरातील टॉवर लोकेशन्स तपासण्यात येत आहे. तसेच महिनाभरात तो कुुटुंब, मित्र याखेरीज अन्य कुणाकुणाच्या संपर्कात होता, याचीही चाचपणी सुरू झाली आहे.