शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला मिळणार ‘रेलटेल’ची मदत

By admin | Updated: April 9, 2016 03:41 IST

तपास यंत्रणेसमोर आव्हान उभे केलेल्या सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी भारतीय रेल्वेचे रेलटेल कॉर्पोरेशन हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाला सहकार्य करणार आहे

यदु जोशी, मुंबईतपास यंत्रणेसमोर आव्हान उभे केलेल्या सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी भारतीय रेल्वेचे रेलटेल कॉर्पोरेशन हे महाराष्ट्राच्या पोलीस दलाला सहकार्य करणार आहे. मुंबईसह चार शहरांमधील रेल्वे स्थानकांवर असलेले सीसीटीव्ही नेटवर्क स्थानिक पोलीस ठाण्यांच्या नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहे. रेलटेलचे देशभरात ४५ हजार रुटकिलोमीटरचे (आरकेएमएस) फायबर आॅप्टिकचे नेटवर्क असून, त्याद्वारे ४ हजार ५०० शहरे / गावे जोडली गेली आहेत. राज्य पोलिसांचे सायबर गुन्हे रोखण्यासाठीचे नेटवर्क गतिमान होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. भारतीय रेल्वे बोर्डचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांच्यात अलीकडे दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली. रेलटेलच्या सहकार्यामुळे राज्यातील दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठीचे बँडविथ सायबर सेलला मिळणार असल्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला मोठी गती मिळेल. तसेच सोशल मीडियावरही नजर ठेवता येईल. अनेकदा सोशल मीडियाचा वापर सामाजिक सौहार्द बिघडविण्यासाठी केल्याचीही उदाहरणे आहेत. रेलटेलच्या सहकार्याने सायबर सेलला दर्जेदार इंटरनेट नेटवर्क मिळेल. आज इंटरनेट कनेक्टिव्हिटीच नाही अशा ठिकाणीही त्यामुळे पोहोचता येईल. याशिवाय, राज्याच्या सायबर प्रकल्प विकासासाठी सीडॅकचे सहकार्य देण्यास केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर गुन्ह्यांचा बीमोड करण्याचा संकल्प २०१४मध्ये व्हिजन डॉक्युमेंटमध्ये केला होता. त्याला मूर्त रूप देण्यासाठी आता पावले उचलली जात आहेत. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात मंत्रालयामध्ये विशेष विभागही स्थापन करण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून दहशतवाद्यांकडून होणारा इंटरनेटचा वापर, आॅनलाइन आर्थिक घोटाळे, सोशल मीडियाचा वापर याबाबत हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.