शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी राज्याची चतु:सूत्री

By admin | Updated: February 9, 2015 05:32 IST

शेती विकास, रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन आणि जलयुक्त शिवार ही चतु:सूत्री महाराष्ट्र सरकारने प्राधान्याने स्वीकारली असल्याचे

नवी दिल्ली : शेती विकास, रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन आणि जलयुक्त शिवार ही चतु:सूत्री महाराष्ट्र सरकारने प्राधान्याने स्वीकारली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निती आयोगापुढे बोलताना स्पष्ट केले. विदर्भ व मराठवाडा या मागास भागास अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. निती आयोगापुढे महाराष्ट्राची बाजू मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत ‘टीम इंडिया’ची अनुभूती आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अपेक्षा व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या विकास आराखड्यानुसार निधी मंजूर करण्याचे निती आयोगाने मान्य केले आहे. मात्र राज्य सरकारला निधी मिळाल्यावर आमचा प्राधान्यक्रम हा वरील चतु:सूत्रीला राहील. केंद्राच्या ७६ योजनांमध्ये राज्य सरकारला निधी दिला जातो. या योजना राबवताना येणाऱ्या अडचणी व त्यांची सोडवणूक करण्याकरिता केंद्र सरकारकडून अपेक्षित साहाय्य यावर बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर या योजनांमध्ये दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना द्यायच्या मदतीची रक्कम अद्याप केंद्र सरकारने दिलेली नाही, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातील अंतिम आणेवारी केंद्र सरकारला सादर केली आहे. या आठवड्यात निर्णय अपेक्षित आहे. आणेवारीचे सध्याचे निकष शिथिल करण्याची मागणी फडणवीस यांनी केली. राज्यातील साखर कारखान्यांना अतिरिक्त निधी देण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याबरोबर रेल्वे अर्थसंकल्पाकडून महाराष्ट्राच्या असलेल्या अपेक्षांची चर्चा केलेली आहे. रेल्वेकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा पॅटर्न बदलण्याची विनंती केली असून, रेल्वेमंत्र्यांनी यासंदर्भात दिलेल्या आश्वासनावर आपण समाधानी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)