शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

राज्यातील परिचारिका होणार ‘अपग्रेड’

By admin | Updated: May 31, 2016 06:13 IST

आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना भविष्यात चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने घेतला आहे.

मुंबई : आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना भविष्यात चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने घेतला आहे. कौन्सिलच्या ५०व्या वर्षात राज्यातील २ लाख परिचारिका आणि शिकाऊ परिचारिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या हेल्थ करिअर्स इंटरनॅशनलशी सामंजस्य करार केला आहे. परदेशात शुश्रूषा क्षेत्रात परिचारिकांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अनेक परिचारिका देशात शिक्षण पूर्ण केल्यावर परदेशात नोकरीसाठी जातात. परिचारिकांना मिळणारे वेतन अत्यल्प असल्याने परिचारिका परदेशात जाण्याचा मार्ग स्वीकारतात. पण, यापुढे परिचारिका क्षेत्रातील संधीविषयी जनजागृती व्हावी. परिचारिकांची कौशल्ये वाढल्यास त्या चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देऊ शकतात. त्यामुळे वेतनात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे परिचारिकांना ‘स्पेशल’ विषयांत प्रशिक्षण दिल्यास त्या योग्य प्रकारे रुग्णांची सेवा स्वतंत्रपणे करू शकतात, असे मत कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. रामलिंग माळी यांनी मांडले. डॉ. माळी यांनी पुढे सांगितले, आॅस्ट्रेलियातील हेल्थ करिअर्स इंटरनॅशनलशी करार केल्यामुळे राज्यातील परिचारिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. ४ वर्षांच्या करारात राज्यातील २ लाख परिचारिकांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षणावेळी त्या विभागातील दोन शिक्षक आणि हेल्थ करिअर्सचा एक शिक्षक असणार आहे. त्यामुळे त्या भागातील परिचारिकांना भाषेचा अडसर येणार नाही. सध्या परिचारिकांची संख्या कमी आहे. पण, पुढच्या काळात परिचारिका क्षेत्रातील संधी समोर आल्याने परिचारिकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान असणाऱ्या परिचारिकांमुळे रुग्णसेवेचा दर्जाही उंचावेल, असे मत हेल्थ करिअर इंडिया इंटरनॅशनलायझेशन कमिटीचे अध्यक्ष डॉ. अरुण जामकर यांनी मांडले. (प्रतिनिधी)