कोल्हापूर : संपूर्ण महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचा आम्ही निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यातून शब्द दिला आहे. हा शब्द आम्ही पाळणार आहोत. ‘रस्ते की खड्डे’ अशा प्रश्नात नागरिकांना पाडण्याऐवजी राज्यात चांगले रस्ते करण्यावर माझा भर राहणार आहे, असे सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे सांगितले. भाजपा सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते रविवारी कोल्हापुरात आले होते. पाटील म्हणाले, दुरुस्तीचा खर्च कमी राहील असे रस्ते केले जातील. आधीच्या मंत्र्यांमुळे सार्वजनिक बांधकाम खातेच नव्हे, तर सर्वच खाती भ्रष्टाचारामुळे बदनाम झाली आहेत. त्यामुळे या खात्यांतील भ्रष्टाचार संपवून सामान्य माणसाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी, खा. राजू शेट्टी यांना ऊस दरासाठी २५ तारखेची वाट पाहावी लागणार नाही. गेल्या तीन वर्षांत सहकार क्षेत्रातील निवडणुका झालेल्या नाहीत. त्या ३१ डिसेंबरपूर्वी घेणार आहोत. सहकार कायद्यात आवश्यक सुधारणा डिसेंबर अथवा मार्चच्या अधिवेशनात करणार आहोत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)
राज्य टोलमुक्त करण्याचा शब्द पाळणार
By admin | Updated: November 3, 2014 03:33 IST