शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’तर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा

By admin | Updated: June 16, 2017 00:38 IST

मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या अग्रगण्य दैनिक ‘लोकमत’ने प्रतिभाशाली कवींना अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ आणि त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या अग्रगण्य दैनिक ‘लोकमत’ने प्रतिभाशाली कवींना अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ आणि त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा करण्यासाठी राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केली आहे. ‘लोकमत’ने समाज, संस्कृती आणि साहित्य हे तिन्ही विषय कायमच केंद्रस्थानी ठेवले आहेत. मराठी साहित्य विश्वात ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’नी मानाचे स्थान मिळविले आहे. आता या काव्यस्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील कवींच्या उत्तमोत्तम कविता राज्यभरातील वाचकांपर्यंत घेऊन जाता येतील. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुतांच्या शब्दांत सांगायचे, तर कविता ही लखलखती वीज आहे. तिला समर्थपणे पेलणारे अनेक कवी महाराष्ट्रात आहेत. सध्या नव्या पिढीतील कवी आशयगर्भ आणि कसदार कविता करीत आहेत. त्यांच्या प्रतिभेला या स्पर्धेच्या निमित्ताने नव्याने व्यक्त व्हायची संधी मिळेल. अशा दर्जेदार कवींना सर्वदूरच्या वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम माध्यम म्हणून ‘लोकमत’ करणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या दुर्गम गावागावांमध्येही कविता करणारे कवी आहेत. अशा सर्वांना एकत्रितपणे सामावून घेण्यासाठी व त्यातून सर्वोत्कृष्ट कवी व त्यांनी केलेल्या सर्वोत्तम कवितांची निवड करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सहभागी होणाऱ्या कवींमधून परीक्षक मंडळ विजेत्यांची निवड करेल. त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसह ५ उत्तेजनार्थ विजेत्यांचीही निवड केली जाईल. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ५ हजार, द्वितीय क्रमांकास ३ हजार, तृतीय क्रमांकास २ हजार तसेच ५ उत्तेजनार्थ विजेत्यांना १ हजार रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येईल. इच्छुक कवींनी त्यांच्या कविता २५ जून २०१७ पर्यंत kavyarutu@lokmat.com या इ-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे. कविता जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवाव्यात.काव्यस्पर्धेचे नियम व अटी : - दोन स्वरचित कविता पाठवाव्यात. - कविता एकाच फुलस्केप पानावर असावी.- कवितेसाठी विषयाचे बंधन नाही. - कविता पाठविण्याची अंतिम मुदत २५ जून २०१७. - परीक्षकांनी निवडलेल्या कवितांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशी ३ बक्षिसे आणि ५ उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. - यथावकाश योग्य वेळी व योग्य ठिकाणी कविता प्रसिद्ध केली जाईल.- कविता स्कॅन करून न पाठवता पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवाव्यात.