शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

‘लोकमत’तर्फे राज्यस्तरीय काव्य स्पर्धा

By admin | Updated: June 21, 2017 02:23 IST

दैनिक ‘लोकमत’ने प्रतिभाशाली कवींना अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ आणि त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा करण्यासाठी राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मराठी मनाचा मानबिंदू असलेल्या अग्रगण्य दैनिक ‘लोकमत’ने प्रतिभाशाली कवींना अभिव्यक्तीचे नवे व्यासपीठ आणि त्यांच्या काव्यप्रतिभेला मानाचा मुजरा करण्यासाठी राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित केली आहे. ‘लोकमत’ने समाज, संस्कृती आणि साहित्य हे तिन्ही विषय कायमच केंद्रस्थानी ठेवले आहेत. मराठी साहित्य विश्वात ‘लोकमत साहित्य पुरस्कारां’नी मानाचे स्थान मिळविले आहे. आता या काव्यस्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील कवींच्या उत्तमोत्तम कविता राज्यभरातील वाचकांपर्यंत घेऊन जाता येतील. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुतांच्या शब्दांत सांगायचे, तर कविता ही लखलखती वीज आहे. तिला समर्थपणे पेलणारे अनेक कवी महाराष्ट्रात आहेत. सध्या नव्या पिढीतील कवी आशयगर्भ आणि कसदार कविता करीत आहेत. त्यांच्या प्रतिभेला या स्पर्धेच्या निमित्ताने नव्याने व्यक्त व्हायची संधी मिळेल. अशादर्जेदार कवींना सर्वदूरच्या वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम माध्यम म्हणून ‘लोकमत’ करणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या दुर्गम गावागावांमध्येही कविता करणारे कवी आहेत. अशा सर्वांना एकत्रितपणे सामावून घेण्यासाठी व त्यातून सर्वोत्कृष्ट कवी व त्यांनी केलेल्या सर्वोत्तम कवितांची निवड करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सहभागी होणाऱ्या कवींमधून परीक्षक मंडळ विजेत्यांची निवड करेल. त्यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसह ५ उत्तेजनार्थ विजेत्यांचीही निवड केली जाईल. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास ५ हजार, द्वितीय क्रमांकास ३ हजार, तृतीय क्रमांकास २ हजार तसेच ५ उत्तेजनार्थ विजेत्यांना १ हजार रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात येईल. इच्छुक कवींनी त्यांच्या कविता २५ जून २०१७ पर्यंत  kavyarutu@lokmat.comया इ-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे. कविता जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवाव्यात. काव्यस्पर्धेचे नियम व अटी : दोन स्वरचित कविता पाठवाव्यात. कविता एकाच फुलस्केप पानावर असावी.कवितेसाठी विषयाचे बंधन नाही. कविता पाठविण्याची अंतिम मुदत २५ जून २०१७. परीक्षकांनी निवडलेल्या कवितांना प्रथम, द्वितीय व तृतीय अशी ३ बक्षिसे आणि ५ उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातील. यथावकाश योग्य वेळी व योग्य ठिकाणी कविता प्रसिद्ध केली जाईल.कविता स्कॅन करून न पाठवता पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठवाव्यात.