शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात अ‍ॅक्टिव्हपेक्षा पॅसिव्ह स्मोकिंग जास्त

By admin | Updated: December 14, 2015 00:26 IST

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी असूनही त्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र राज्यात आहे. केंद्र सरकारने घातलेली ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.

पुणे : सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी असूनही त्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र राज्यात आहे. केंद्र सरकारने घातलेली ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करणाऱ्यांमुळे स्मोकिंग न करणाऱ्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याच स्पष्ट झाले आहे.पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजेच स्वत: स्मोकिंग न करताही सिगारेटचा धूर श्वासावाटे शरीरात जाणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच ३० टक्के इतके असल्याचे नुकत्याच झालेल्या ग्लोबल अ‍ॅडल्ट टोबॅको सर्व्हे इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे. इतकेच नाही तर अ‍ॅक्टिव्ह स्मोकर्स हे १५ टक्के असून, पॅसिव्ह स्मोकर्स ३० टक्के असल्याने आरोग्याच्यादृष्टीने ही धोकादायक बाब असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. सिगारेटमुळे कॅन्सरच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत असून, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट न ओढणारेही आपोआप कॅन्सरच्या जाळ्यात ओढले जातात. देशात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा या राज्यांमध्ये पॅसिव्ह स्मोकिंग करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. कुटुंबामध्ये कुणी एखादा सिगारेट ओढत असेल तरी त्याच्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्य नकळत सिगारेट ओढत असतात. सिगारेट ओढणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा किंवा हृदयाचे विकार होण्याचा धोका असतोच, परंतु सिगारेट न ओढणारेही नकळत सिगारेट ओढत असतात. त्यांच्या नाक आणि तोंडावाटे फुफ्फुसात सिगारेटचा धूर ओढला जातो. अनेकांना आपण पॅसिव्ह स्मोकिंगच्या केव्हा बळी जातो हे कळतही नाही. त्यामुळे एखाद्याला श्वसनाचा आजार झाला तर तो नेमका कशामुळे झाला याचे निदान करता येत नाही. (प्रतिनिधी)एक माणूस सिगारेट ओढत असेल तर त्याच्या आजूबाजूच्या दोन ते तीन जणांवर त्याचा परिणाम होतो. पॅसिव्ह स्मोकिंग हे अनेकदा अ‍ॅक्टिव्ह स्मोकिंगपेक्षाही हानीकारक ठरु शकते. सिगारेटचा धूर हा त्यातील तंबाखूमुळे होणारा आणि बाजूच्या कागदाचा अशा दोन प्रकारात असतो. पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये कागदाचा धूर हा बाजूच्या व्यक्तींच्या शरीरात श्वासावाटे जातो, जो जास्त हानीकारक असतो. या धुरामुळे ब्रॉंकायटीस, फुफ्फुसांचा कर्करोग, न्यूमोनिया असे आजार होतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यावर असणारी बंदी काटेकोरपणे पाळली जायला हवी. - डॉ. संदीप साळवी, संचालक, चेस्ट रिसर्च फाउंडेशन