शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारकडून लवकरच नाणारसाठी जमीन मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:32 IST

यूएईच्या राजदूतांची माहिती; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला सुरुंग

नवी दिल्ली : नाणारच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाला सध्या राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बुधवारी विधिमंडळात दिली होती. या घोषणेला २४ तास उलटत नाहीत तोच, या प्रकल्पासाठी काही आठवड्यातच आम्हाला राज्य सरकारकडून जमीन मिळणार आहे, असे यूएईच्या राजदूतांनी नवी दिल्लीत गुरुवारी स्पष्ट केले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वक्तव्यामुळे राज्यात नाणार प्रकल्पावरुन सुरु असलेला वाद पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.‘भारत-यूएई-सौदी अरेबिया यांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी काही आठवड्यातच जमीन मिळेल’, असे यूएईचे राजदूत अहमद अल्बाना यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. नाणार प्रकल्पात केंद्र सरकारच्या तिन्ही तेल कंपन्या, सौदी अरेबियातील सौदी आरमॅको व यूएईतील अबु धाबी नॅशनल आॅइल कंपनी (अ‍ॅडनॉक) यांची संयुक्त गुंतवणूक असेल.

पण राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचा या प्रकल्पाला सुरुवातीपासून जोरदार विरोध आहे. अनेक पर्यावरणवादीही या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. या विरोधाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या भूमी संपादनाला स्थगिती दिली होती. असे असताना दुसरीकडे केंद्र सरकार या प्रकल्पासाठी जोरदार तयारी करीत असल्याचे अल्बाना यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे.नवी दिल्ली : नाणारच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या भूसंपादनाला सध्या राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. ही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बुधवारी विधिमंडळात दिली होती. या घोषणेला २४ तास उलटत नाहीत तोच, या प्रकल्पासाठी काही आठवड्यातच आम्हाला राज्य सरकारकडून जमीन मिळणार आहे, असे यूएईच्या राजदूतांनी नवी दिल्लीत गुरुवारी स्पष्ट केले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वक्तव्यामुळे राज्यात नाणार प्रकल्पावरुन सुरु असलेला वाद पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.‘भारत-यूएई-सौदी अरेबिया यांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी काही आठवड्यातच जमीन मिळेल’, असे यूएईचे राजदूत अहमद अल्बाना यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे. नाणार प्रकल्पात केंद्र सरकारच्या तिन्ही तेल कंपन्या, सौदी अरेबियातील सौदी आरमॅको व यूएईतील अबु धाबी नॅशनल आॅइल कंपनी (अ‍ॅडनॉक) यांची संयुक्त गुंतवणूक असेल.

पण राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचा या प्रकल्पाला सुरुवातीपासून जोरदार विरोध आहे. अनेक पर्यावरणवादीही या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. या विरोधाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाच्या भूमी संपादनाला स्थगिती दिली होती. असे असताना दुसरीकडे केंद्र सरकार या प्रकल्पासाठी जोरदार तयारी करीत असल्याचे अल्बाना यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पnanar refinery projectनाणार प्रकल्प