शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या कारभारावर राज्य सरकारचा वॉच

By admin | Updated: June 20, 2016 20:35 IST

राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणकेवर दणके देण्यास सुरुवात केली आहे़. पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क

ऑनलाइन लोकमत

मुंबई : राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणकेवर दणके देण्यास सुरुवात केली आहे़. पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क लेखापरीक्षक पाठविण्यात येणार आहे़. अशाप्रकारची ही पालिकेची इतिहासातील पहिलीच नेमणूक असणार आहे़. त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असूनही शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत़. राज्य शाासनाच्या लेखासेवा विभागाचे सहाय्यक संचालक सुरेश कचरु बनसोडे यांची महापालिकेच्या मुख्यलेखा परीक्षक पदी नियुक्ती करण्यात येणार आहे़. मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही नेमणूक म्हणजे भाजपाने वचक ठेवण्यासारखे असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे़. त्यामुळे ही नियुक्ती रद्द करुन घेण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना सुरु आहे़. त्यानुसार पालिकेचे प्रभारी मुख्यालेखापरीक्षक अनिल बडगुजर यांनाच कायम ठेवण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे़.  चिटणीस आणि लेखा विभाग स्थायी समितीच्या अखत्यारित असल्याने राज्य सरकारने अशापद्धतीने अधिकारी पाठविणे अयोग्य असल्याचे, सूर शिवसेनेने लावला आहे़. स्थायी समितीचे अधिकार डावलण्याचा हा प्रकार असल्याचा युक्तिवाद शिवसेना नेत्यांनी सुरु केला आहे़. या नियुक्तीला तीव्र विरोध करु, असा इशारा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिला आहे़ प्रतिनिधी चौकट बनसोडे यांना सूत्र नाहीच़़ मुख्य लेखापरीक्षक म्हणून नियुक्त झालेले सुरेश बनसोडे यांना येत्या तीन चार दिवसांमध्ये सूत्र स्वीकारायची आहेत़ मात्र शनिवारी ते पालिका मुख्यालयात आले होते़. परंतु आयुक्त त्यावेळी नसल्याने बनसोडे यांना सूत्र देण्यास अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी नकार दिला़ बनसोडे यांनी आज पुन्हा दूरध्वनी केला असता त्यांना नकारच मिळाला़़ विधी समितीचे मत घेणार बाहेरील अधिकाऱ्याला महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास न्यायालयाची स्थगिती आहे़. ही स्थगिती उठविल्याचा दावा बनसोडे यांनी केला असल्याचे समजते़ मात्र पालिका प्रशासन याबाबत अद्याप संभ्रमातच आहे़. त्यामुळे याप्रकरणी विधी विभागाचे मत आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते़ शिवसेना नेत्यांची आगपाखड महापालिकेतील प्रमुख पदे आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक राज्य सरकारच करीत असते़. त्यावर आता मुख्य लेखापरीक्षक नेमून सरकार आपल्याच अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवित आहे़. पालिकेतील अधिकारी सक्षम असून त्यांनाच पदोन्नती मिळायला हवी होती़ शिक्षण अधिकारी राज्य शासनाकडून पाठविण्यास सुरुवात करण्यात आली़ मात्र हा अधिकारी दोन दिवस मुंबईत तर चार दिवस पुण्यात अशी गत आहे़. अशाने पालिकेची कामं होणार कशी, बाहेरुन असे अधिकारी आल्यास पालिकेच्या स्वायत्तेचे काय, अशी आगपाखड स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली आहे़.