शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सरकारचे ट्विटर वॉर

By admin | Updated: July 17, 2016 00:54 IST

खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही

पुणे : खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही मंत्र्यावर कसलेही नियंत्रण नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विधिमंडळात काँग्रेस पक्ष याचा समाचार घेईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महागाई वाढत आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर सरकारचे नियंत्रण हवे ते त्यांना ठेवता येत नाही. तूरडाळीची किंमत वाढत आहे. अनेक मंत्र्यांची विविध प्रकरणे बाहेर येत आहेत. यातून मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नाही हेच दिसते. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. त्यात या विषयांवरून सरकारला धारेवर धरले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबत भाजपाकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. साध्वी प्राची, साक्षीमहाराज हे त्यांचे नेते काय बोलतात याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. त्यांची भाषणेही तेढ निर्माण करणारी आहेत. ती खपवून घेतली जातात व डॉ. नाईक यांच्यावर कारवाईची भाषा केली जाते हे बरोबर नाही. कारवाई करायची तर ती असे भडक बोलणाऱ्या सर्वांवरच करावी. ‘काँग्रेसमुक्त भारत’, ‘मुस्लीममुक्त भारत’ हे बोलणेही आक्षेपार्ह आहे, असे काँग्रेसचे मत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)झाकीर नाईक यांच्याबाबत अहवाल आला नव्हतामुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबतचा प्रतिकूल अहवाल आला होता, मात्र तत्कालीन सरकारने तो दाबून टाकला, या माजी पोलीस महासंचालक व भाजपाचे विद्यमान खासदार सत्यपाल यांच्या आरोपाची चव्हाण यांनी खिल्ली उडविली. मी व पृथ्वीराज चव्हाण असे दोघेही माजी मुख्यमंत्री इथे आहोत व असा कोणताही अहवाल आमच्याकडे आलेला नव्हता. निवृत्त झाल्यावर व भाजपाचा खासदार झाल्यानंतर त्यांना बरेच काही आठवत असेल, असे चव्हाण म्हणाले.महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची किंवा नाही याचा निर्णय स्थानिक स्तरावर घेतला जाईल. त्यांच्या अहवालाचा विचार करूनच काँग्रेस काय ते ठरवेल. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्ण तयारीत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याची पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्याचे, शहराचे अध्यक्ष साह्य करतील. अशी पाच ते सहा प्रमुख नेत्यांची एक समिती निवडणुकीसंबंधीचे काम करेल. पुण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जबाबदारी आहे. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस