शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण मंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी

By admin | Updated: April 28, 2017 03:45 IST

तानसा पाइपलाइनजवळील झोपड्या हटवण्याच्या कामात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने

मुंबई : तानसा पाइपलाइनजवळील झोपड्या हटवण्याच्या कामात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केल्याने या आरोपावर राज्य सरकारची काय भूमिका आहे? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.‘मंत्र्यांच्या विरुद्ध गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंत्र्यांच्या वतीने भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर करावे,’ असे निर्देश न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.तानसा पाइपलाइनच्या १० मीटर बफर झोन ठेवावा व या हद्दीतील अतिक्रमण हटवावे, असा आदेश उच्च न्यायालयाने २००९मध्ये जनहित मंच या एनजीओने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दिला होता. त्यानुसार मुंबई महापालिका टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवत आहे. महापालिकेचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. भटवाडी येथील पाइपलाइनजवळील झोपड्या हटवण्यापूर्वी महापालिकेने टिळकनगर पोलिसांकडून संरक्षण मागितले. मात्र, त्या वेळी पोलीस ठाण्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते आणि त्यांनी संबंधित झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन कुर्ला एचडीआयएल येथे करण्यात येत नाही, तोपर्यंत झोपड्यांना हात लावू नका, असे म्हटले. त्यानंतर पोलिसांनी संरक्षण देण्यास नकार दिला, असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. बुधवारच्या सुनावणीत महाधिवक्त्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार महाधिवक्ता रोहित देव खंडपीठापुढे उपस्थित राहिले.१४ एप्रिलला आंबेडकर जयंती असल्याने १५ एप्रिल सकाळपर्यंत पोलीस बंदोबस्त असल्याने महापालिकेला पोलीस संरक्षण देण्यात आले नाही, अशी माहिती देव यांनी खंडपीठाला दिली. यादरम्यान मंत्र्यांनी पोलीस ठाण्याला का भेट दिली, असा प्रश्न केल्यावर देव यांनी याबाबत मंत्र्यांकडून सूचना नसल्याचे खंडपीठाला सांगितले. दरम्यान, खंडपीठाने टिळकनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांच्या पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही आहेत का? अशी विचारणा केली. मात्र संबंधित अधिकाऱ्याला याबाबत माहिती देता आली नाही. विचार करून व कनिष्ठ अधिकाऱ्याकडून माहिती घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने सहा-सात सीसीटीव्ही असल्याची माहिती खंडपीठाला दिली.त्यावर खंडपीठाने या सीसीटीव्हींचे फूटेज पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले. तर महापालिकेला पोलिसांबरोबर केलेल्या पत्रव्यवहाराची तपशिलात माहिती देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली. (प्रतिनिधी)