शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

राज्य सरकारच जबाबदार

By admin | Updated: January 5, 2016 03:12 IST

गेले दीड वर्ष केंद्र शासनाच्या विविध उपाय योजनांमुळे भाज्या तसेच इतर खाद्यपदार्थांचे दर नियंत्रित राहिले आहेत. राज्य शासनाने सूचना देऊनही योग्य उपाययोजना न केल्याने महाराष्ट्रात डाळींच्या किमती

पुणे : गेले दीड वर्ष केंद्र शासनाच्या विविध उपाय योजनांमुळे भाज्या तसेच इतर खाद्यपदार्थांचे दर नियंत्रित राहिले आहेत. मात्र, राज्य शासनाने सूचना देऊनही योग्य उपाययोजना न केल्याने महाराष्ट्रात डाळींच्या किमती भडकल्या, असे सांगून केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र शासन केवळ धोरण तयार करते, त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. पुढील वर्षीही देशात डाळींचे उत्पादन कमीच होणार असल्याने आता तरी राज्य शासनाने व्यापाऱ्यांचा साठा नियंत्रित करावा, तसेच खासगी व्यापाऱ्यांच्या आयातीवर अवलंबून न राहता स्वत: डाळ आयात करावी, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.तीन वर्षांपासून देशात डाळींचे उत्पन्न घटत आहे. दुसरीकडे, दर वर्षी ९ लाख टनांनी डाळीची मागणी वाढत आहे. २०१३-१४मध्ये देशात हे उत्पादन १९२ लाख टन होते, तर मागणी २२० लाख टन होती़ २०१४-१५मध्ये हे उत्पादन १७० लाख टनांपर्यंत खाली आले. मात्र, मागणी २२६ टन होती. हीच स्थिती २०१५-१६मध्येही असून, उत्पादन १७० टन, तर मागणी २२५ टनांवर आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात पुन्हा डाळींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाकडून विविध धोरणात्मक उपाय राबविले जात आहेत. मात्र, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्य शासनच करणार आहे. गतवर्षी राज्याने डाळींच्या साठ्यांवर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य देणे, साठेबाजांवर छापे टाकणे आवश्यक होते. मात्र, याउलट शासनाने साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना सवलती देण्याची भूमिका घेतली. त्याला आम्ही काय करणार? पुढील वर्षीही तूरडाळीच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याने राज्यांनी बफर स्टॉक करून ठेवावा, डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, तसेच शासनानेच डाळ आयात करावी, अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पासवान यांनी या वेळी दिली.