शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डाळींच्या दरवाढीला राज्य सरकार जबाबदार

By admin | Updated: January 5, 2016 00:15 IST

गेले दीड वर्ष केंद्र शासनाच्या विविध उपाय योजनांमुळे भाज्या तसेच इतर खाद्यपदार्थांचे दर नियंत्रित राहिले आहेत. मात्र, राज्य शासनाने सूचना देऊनही योग्य उपाययोजना न केल्याने

पुणे : गेले दीड वर्ष केंद्र शासनाच्या विविध उपाय योजनांमुळे भाज्या तसेच इतर खाद्यपदार्थांचे दर नियंत्रित राहिले आहेत. मात्र, राज्य शासनाने सूचना देऊनही योग्य उपाययोजना न केल्याने महाराष्ट्रात डाळींच्या किमती भडकल्या, असे सांगून केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी याबाबत राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र शासन केवळ धोरण तयार करते, त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे. पुढील वर्षीही देशात डाळींचे उत्पादन कमीच होणार असल्याने आता तरी राज्य शासनाने व्यापाऱ्यांचा साठा नियंत्रित करावा, तसेच खासगी व्यापाऱ्यांच्या आयातीवर अवलंबून न राहता स्वत: डाळ आयात करावी, असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. तीन वर्षांपासून देशात डाळींचे उत्पन्न घटत आहे. दुसरीकडे, दर वर्षी ९ लाख टनांनी डाळीची मागणी वाढत आहे. २०१३-१४मध्ये देशात हे उत्पादन १९२ लाख टन होते, तर मागणी २२० लाख टन होती़ २०१४-१५मध्ये हे उत्पादन १७० लाख टनांपर्यंत खाली आले. मात्र, मागणी २२६ टन होती. हीच स्थिती २०१५-१६मध्येही असून, उत्पादन १७० टन, तर मागणी २२५ टनांवर आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात पुन्हा डाळींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाकडून विविध धोरणात्मक उपाय राबविले जात आहेत. मात्र, त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी राज्य शासनच करणार आहे. गतवर्षी राज्याने डाळींच्या साठ्यांवर नियंत्रण ठेवण्यास प्राधान्य देणे आवश्यक होते.