शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांवर टपाल तिकीट काढण्यास राज्यशासनाकडे पैसा नाही !

By admin | Updated: November 19, 2016 02:01 IST

राज्याचे अवर सचिव पांचाळ यांच्या पत्रामुळे शिवसैनिक संतप्त.

संजय खांडेकरअकोला, दि. १८- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे टपाल तिकीट काढण्यास राज्याच्या युती शासनाकडे पैसा नाही, असे पत्र समान्य प्रशासन विभाग मंत्रालयाचे अवर सचिव र. ग. पांचाळ यांनी पाठविल्याने शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर निष्ठा ठेवणार्‍या नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २0१२ रोजी निधन झाल्यानंतर राज्यभरात शोककळा पसरली होती. १८ नोव्हेंबर रोजी निघालेल्या अंत्ययात्रेत बाळासाहेबांवर प्रेम करणार्‍या शोकाकुल नागरिकांनी मुंबई थबकली होती. अकोला महापालिकेच्या नगरसेविका अँड. धनश्री अभ्यंकर-देव यांनी तत्कालीन केंद्रीय माहिती व संचार मंत्री कपिल सिब्बल आणि राज्य शासनाकडे बाळासाहेबांवर टपाल तिकीट काढण्याची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर देशात आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. नगरसेविका धनश्री अभ्यंकर-देव यांनी टपाल तिकिटासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला. युती सरकारच्या काळात हे टपाल तिकीट निघेल ही अपेक्षा होती; मात्र महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव पांचाळ यांनी शासनाकडे आर्थिक तरतूद नसल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. ज्या व्यक्तींची जन्मशताब्दी किंवा शंभरावी पुण्यतिथी असेल अशाच व्यक्तींवर शासनानडून टपाल तिकीट काढण्यासाठी आर्थिक तरतूद असल्याचेही त्यांनी अँड. देव यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तमाम शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टपाल तिकीट काढण्यासाठी राज्याच्या युती शासनाकडे पैसा नसेल तर शिवसेना खासगी खर्चातून बाळासाहेबांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी टपाल तिकीट काढेल, असे मत याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख अतुल पवनीकर यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना नोंदविले.- केंद्र शासनाची किंवा पोस्ट विभागाची योजना असेल तर असे अवर सचिवांनी महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या भावना समजून जबाबदारीने पत्र पाठवायला हवे होते. याबाबत अधिक माहिती घेतल्यानंतर बोलता येईल. - दिवाकर रावते, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य.