शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांना ११०० कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 05:09 IST

बोंडअळीग्रस्त शेतकºयांना लवकरच ११०० कोटींची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबई : बोंडअळीग्रस्त शेतकºयांना लवकरच ११०० कोटींची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बोंडअळीने ४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी राज्यात ३४ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारने केलेल्या सर्वेक्षणात आढळले होते. त्यात विदर्भातील कापूसउत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाले होते. राज्य सरकारने केंद्राला ३,३७३ कोटी मदतीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. संबंधित मदत येण्याआधी सरकारने स्वत:च्या हिश्शाची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.कीटकनाशकांमुळे भात व इतर खरीप पिकाचेही नुकसान झाले होते. संबंधित शेतकºयांनाही उपरोक्त निधीतून मदत दिली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या मदतीचे वितरण सुरू होईल, अशी माहिती कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी दिली. ३० एप्रिल व १ मे रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्यानंतर मदतीबाबत अधिक माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी व त्यांचे बँक खात्यांची यादी तयार केली आहे. शेतकºयांच्या खात्यांवर ही मदत जमा होईल.मदतीसाठी कृषिमंत्री फुंडकर यांचा पुढाकारनागपूर येथे २२ एप्रिलला कापसावरील बोंडअळीच्या व्यवस्थापनाबाबत  बैठक झाली होती. त्यास केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आदी उपस्थित होते. बैठकीत नुकसानीच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आल्याचे पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले होते. नागपूरसह वगळण्यात आलेल्या जिल्ह्यांचा नव्या प्रस्तावात समावेश केला असून नुकसानग्रस्त शेतकºयांना लवकरच मदत देणार असल्याचे त्यांनी बैठकीनंतर जाहीर केले होते.